Room Heater Side Effects: सध्या भारतात थंडीचा सीजन सुरु असून प्रचंड प्रमाणावर तापमान घसरत आहे. यामुळे हवेतील गारवा वाढून लोकांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. विशेषतः उत्तर भारतात थंडीने कहर केला असून या थंडीत लोकांचे हाल होत आहेत. या थंडीपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाययोजना करतात, जर गावात असतील तर शेकोटी पेटवून उब घेतात पण तुम्ही रात्री उशिरा बाहेर बसू शकत नाही. यासाठी तुम्हाला घरात रुम हीटर(Room Heater) किंवा ब्लोअर(Blower) वापरावा लागतो. या हिटरमुळे थंडीपासून तर संरक्षण होते पण हा तुमच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे, कसा? चला जाणून घेऊयात.
हीटर आरोग्यासाठी हानिकारक का आहे?
थंड हवा टाळण्यासाठी इन्फ्रारेड हीटर्स(Infrared Heater), फॅन हीटर(Fan Heater) किंवा ऑइल हीटर(Oil Heater) तसेच अनेक प्रकारचे रूम हिटरही बाजारात सध्या उपलब्ध आहेत. हीटर(Heater) बंद खोलीत हवा गरम करण्याचे काम करतो. पण तुम्हाला माहिती नसेल की गरम हवा करण्यासोबत हवा कोरडी करण्याचे काम देखील हीटर करत असतो. अशी कोरडी हवा आपल्या शरीराला नुकसान पोहचवू शकते.
याशिवाय बंद खोलीत हीटर चालवल्याने खोलीतील ऑक्सिजनची(Oxygen Level) पातळी कमी होऊ लागते.त्यामुळे खोलीमधील आर्द्रता देखील कमी होते. याचा परिणाम असा होऊ लागतो की, लोकांचे नाक-डोळे बंद होऊ लागतात. हीटरमधून कार्बन मोनोऑक्साईड(Monoxide) हा वायू बाहेर पडतो, जो शरीरातील फुफूसांसाठी अत्यंत घातक ठरतो. याशिवाय रक्तातील हिमोग्लोबिन(Hemoglobin) कमी करण्यासाठी सुद्धा हिटर कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे थंडीत हीटर वापरणं तुम्हा आम्हाला चांगलचं महागात पडू शकतं.
गरम कपड्याचा वापर करा
थंडीच्या दिवसात मोठ्या जड किंवा लोकरीच्या उब देणाऱ्या कपड्यांचा वापर करा. हे कपडे तुमच्या शरीराला उब देतात. याशिवाय थंडीच्या दिवसात आहारात लोणी, तूप, तीळ अशा स्निग्ध पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर करा.