Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Road Transport: महामार्ग बांधणी, रेल्वे प्रकल्पांची कामे कासवगतीने, सरकारी अहवालातून माहिती समोर

Road transport and highways

Image Source : www.outlookindia.com

रस्ते आणि महामार्ग विकासातील अनेक प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू असल्याची माहिती सरकारी अहवालातून समोर आले आहे. महामार्ग, रस्ते वाहतूक क्षेत्रातील (Road transport and highways sector project) बांधकाम प्रकल्प सर्वात जास्त रखडले आहेत. त्याखालोखाल रेल्वेचे, पेट्रोलियम क्षेत्रातील प्रकल्प रखडले आहेत.

देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने उभे राहण्याची आवश्यकता आहे. देशभरात अशा हजारो प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांकडून होत असते. मात्र, यातील अनेक प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू असून दिरंगाई होत असल्याचे वास्तव, सरकारी अहवालातून समोर आले आहे. महामार्ग, रस्ते वाहतूक क्षेत्रातील (Road transport and highways sector project)  बांधकाम प्रकल्प सर्वात जास्त रखडले आहेत. त्याखालोखाल रेल्वेचे, पेट्रोलियम क्षेत्रातील प्रकल्प रखडले आहेत.

रखडलेल्या प्रकल्पांची आकडेवारी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम क्षेत्रातील एकूण ७६९ प्रकल्पांपैकी ३५८ प्रकल्प रखडले आहेत. 
भारतीय रेल्वेच्या १७३ प्रकल्पांपैकी १११ प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत.
पेट्रोलियम क्षेत्रातील एकूण १५४ पैकी ८७ प्रकल्प रखडले आहेत.

ही आकडेवारी नोव्हेंबर २०२२ मधील असून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मॉनिटरिंग डिव्हिजनच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. Infrastructure and Project Monitoring Division (IPMD) ही संस्था केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाच्या अंतर्गत येते. १५० कोटींपेक्षा जास्त रकमेचे प्रकल्पांवर देखरेख करण्याचे काम IPMD या संस्थेकडे आहे. 

तब्बल 23 वर्ष रखडला प्रकल्प

रेल्वे विभागाचा मुनिराबाद-महबुबनगर रेल्वे प्रकल्प तब्बल २७६ महिने म्हणजे २३ वर्ष झाले रखडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानंतर उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प २४७ महिने रेंगाळला आहे. तर बेलापूर सीवूड अर्बन इलेक्ट्रिफाईड डबल लाइन हा प्रकल्प २२८ महिने रखडला आहे. या अहवालात सुमारे १ हजार ४७६ प्रकल्पांची माहिती देण्यात आली असून यातील अनेक प्रकल्प नियोजित वेळेच्या खूपच मागे असल्याचे समोर आले आहे.