Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Right Age to Buy Health Insurance: आरोग्य विमा खरेदीचे योग्य वय कोणते, जाणून घ्या सविस्तर

Health Insurance

Right Age to Buy Health Insurance: बरेच लोक हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वयाची वाट पाहत वेळ वाया घालवतात. अनेकांना हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वय कोणते? असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करुया.

Right Age to Buy Health Insurance: जीवनातील चढ-उताराच्या काळात आजारांशी सामना करण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स हे प्रभावी आर्थिक संरक्षण साधन आहे.  अनेकांना हेल्थ इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी योग्य वय कोणते? असा प्रश्न पडतो. वैद्यकीय खर्च आणि वाढते आजार लक्षात घेता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कमी वयातच घेणे कधीही चांगले मानले जाते. कोणी कमी वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूकीचा विचार करतं तर कोणाला उशीरा पॉलिसी घ्यावीशी वाटते. वेगवेगळ्या वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना कोणते मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत? ते पाहूया.

विशीत हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना…

लहान वयात, थोडक्यात जर तुम्ही तुमच्या विशीमध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यास तुम्ही तिचा प्रीमियम सहज भरू शकता. कारण या वयात तुमच्यावर सहसा कोणताही आर्थिक दबाव नसतो. परवडणारे प्रीमियम तुम्हाला तुमच्या इन्शुरन्सच्या गरजेनुसार सर्वोत्तम कव्हरेजची निवड करण्यास प्रोत्साहन देईल. या वयात हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना तुम्ही प्रसूती विम्यासारखे अतिरिक्त कव्हरेज देखील घेऊ शकाल. आणि येत्या काही वर्षांत कुटुंब सुरू करण्याची तुमची योजना असेल तर तुमचा वेटिंग पीरियड देखील पूर्ण होईल. शिवाय, तुम्ही लाईफटाईम रिन्युवल सुविधा आणि कम्युलिटिव्ह बोनस सहज मिळवू शकता.

तिशीत हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना...

तुम्ही तुमच्या तिसाव्या वर्षी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना फॅमिली हेल्थ प्लान निवडण्याला प्राधान्य द्याल. या वयात तुम्ही स्थायिक होऊन कुटुंब सुरू करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी आणि मुलांसाठीही कव्हरेजचाही विचार केला असेल. यासोबतच तुम्हाला हृदयविकारांसारख्या आजारांसाठी अतिरिक्त कव्हर खरेदी करण्याचीही इच्छा असेल. त्यामुळे तिशीत तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम आणि इन्शुरन्स प्रीमियम वाढवण्याची शक्यता वाढते.

चाळीशी आणि पन्नाशीत हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना...

वयाच्या चाळीशी आणि पन्नाशीमध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला उच्च कव्हरेजची निवड करावी लागेल. या वयात तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या सर्वात जास्त असण्यासोबतच तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग इ. सारखे काही आजार देखील उद्भवू शकतात. त्यामुळे या वयात हेल्थ इन्शुरन्समध्ये गंभीर आजार आणि विम्याच्या वाढीव फायद्यांसह व्यापक कव्हरेजची निवड तुम्हाला करावी लागेल. पण या वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा विचार करताना तुम्हाला प्रीमियम देखील खूप जास्त भरावा लागेल यात शंका नाही. तुमचा प्रीमियम काही प्रमाणात कमी करण्यासाठी तुम्ही फॅमिली फ्लोटर कव्हरेजची निवड करू शकता. पण तरी ते तुम्हाला महाग ठरु शकते.

वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना...

वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करत असाल, तर तुम्हाला मोठी प्रीमियम रक्कम भरावी लागेल. कारण की, या वयात तुम्हाला गंभीर आरोग्यविषयक आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता जास्त असते. ज्यासाठी दीर्घकालीन उपचार आणि हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता भासू शकते. जीवनाच्या या टप्प्यावर बेसिक हेल्थ इन्सुरन्स पॉलिसी अपुरी पडते. त्यामुळे तुम्हाला सिनिअर सिटीझन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची आवश्यकता पडू शकते. या पॉलिसी आयुष उपचार, निवासी हॉस्पिटलायझेशन, अवयव दात्याचा खर्च इत्यादींसाठी कव्हरेज उपलब्ध करुन देतील.

हेल्थ इन्शुरन्ससाठी IRDAI ने निश्चित केलीय वयाची मर्यादा

आयआरडीएआयनुसार (IRDAI - Insurance Regulatory Development Authority of India) कोणीही 65 वयापर्यंतची व्यक्ती हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करु शकते. तुम्ही जेवढ्या लवकर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी कराल ती वेळ योग्य वेळ ठरेल. कारण की, तुम्ही जितक्या लवकर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी कराल तितके ते तुम्हाला उत्तम आरोग्य आणि पैशांच्या बाबतीत फायदेशीर ठरेल.

News Source: Policybazaar