Richest Village in Asia: हिमाचल प्रदेश हे राज्य सफरचंद फळासाठी ओळखले जाते. एवढेच नाही, तर या राज्याला संपूर्ण जगात ‘अँपल राज्य’ (Apple state) म्हणून ओळखले जाते. सफरचंदाच्या विक्रीमुळे या राज्यातील शिमला जिल्हयातील चौपाल येथील ‘मडावग’ या गावाला आशियातील सर्वाधिक श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. मडावगमधील प्रत्येक ग्रामस्थ हा सफरचंदाची शेती करून, कोटयाधीश बनला आहे.
मडागावच्या ग्रामस्थांचे उत्पन्न
हिमाचल प्रदेशातील मडागाव येथील प्रत्येक शेतकरी सफरचंदाची शेती करतो. या फळाच्या विक्रीमुळे हे गाव आशियातील सर्वाधिक श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील प्रत्येक कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न 35 लाख ते 80 लाख रूपयांपर्यंत आहे. मडगावमध्ये 225 पेक्षा ही अधिक कुटुंब वास्तव्य करीत आहेत. येथील फळबागधारक दरवर्षी सरासरी 150 ते 175 कोटी रूपयांची सफरचंदाची विक्री करत आहेत. या गावापूर्वी शिमला जिल्हयातील क्यारी हे गाव सर्वात श्रीमंत मानले जायचे.
दाशोली हे गाव श्रीमंतीच्या मार्गावर
मडागावसोबतच दाशोली हे गावदेखील श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे. या गावातील छोटा बागायतदार ही 700 ते 1000 पेटी सफरचंद तयार करत असून मोठा बागायतदार 12 हजार ते 15 हजार पेटी सफरचंद तयार करित आहेत. जवळजवळ या गावातील 12 ते 13 कुटुंबानी सर्वोत्तम दर्जा असलेल्या सफरचंदाचे उत्पादन करण्यास सुरूवात केली आहे. या गावातील बागायतदारांच्या बागा 8000 ते 8500 फूट उंचीवर आहेत. सफरचंद फळाच्या लागवडीसाठी ही उंची सर्वोत्तम मानली जात आहे.
जम्मू काश्मीर ही पडले मागे
पंचायत सफरचंद लागवडीसाठी मडावग हे गाव प्रसिध्द आहे. मडावग व दाशोलीचे दर्जेदार सफरचंदाची विक्री देशातील बाजारापेठेत मोठया प्रमाणावर होत आहे. तसेच या सफरचंदाला परदेशात ही मोठी मागणी आहे. म्हणूनच किन्नोर व जम्मू काश्मीरच्या सफचंदाना हे मडावग व दाशोलीचे सफरचंद फळाला मागे टाकत आहे.