Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inflation Rate May: मे महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 4.25%, सामन्यांना दिलासा

Inflation Rate

एप्रिल-2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.7 टक्के इतका नोंदवला गेला होता. मे महिन्यात यात आणखी घट झालेली पाहायला मिळाली आहे. महागाई कमी झाल्याने सर्वसामान्यांन त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात दिलासा मिळणार आहे.

गेली काही दिवस भारतीयांना महागाईचा सामना करावा लागत होता. मात्र आता महागाईच्या बाबतीत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर 4.25% इतका नोंदवला गेला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर गेल्या दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, हे यातून स्पष्ट होते आहे. एप्रिल-2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर  4.7 टक्के इतका नोंदवला गेला होता. मे महिन्यात यात आणखी घट झालेली पाहायला मिळाली आहे. महागाई कमी झाल्याने सर्वसामान्यांन त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात दिलासा मिळणार आहे.

अन्नधान्यांच्या किंमतीत घसरण 

गेल्या काही महिन्यांपासून अन्नधान्यांच्या किमतीत घट पाहायला मिळते आहे. किरकोळ बाजारात भाजीपाला, फळे, किराणा मालाच्या किमतीत घसरण पाहायला मिळते आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात या किमती असल्याचे निदर्शनास आले आहेत. एप्रिलमध्ये अन्नधान्यांच्या बाबतीत महागाई दर 3.84 टक्के नोंदवला गेला होता. मे महिन्यात हा महागाईचा दर  2.91 टक्के इतका नोंदवला गेलाय. याशिवाय इंधन, वीज यांच्या दरात देखील  5.52 टक्क्यांवरून 4.64 टक्के घट नोंदवली गेली आहे.

सलग चौथ्या महिन्यात महागाईत घसरण

मागील वर्षी मे 2022 मध्ये किरकोळ महागाई 7.04 टक्क्यांच्या पातळीवर होती. यावर्षीच्या आकडेवारीनुसार, मे 2023 मध्ये किरकोळ चलनवाढ 4.25 टक्क्यांवर होती, जी एप्रिल 2021 नंतरची नीचांकी पातळी आहे. एप्रिल 2023 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित महागाई 4.7 टक्के इतकी नोंदवली गेली होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, एप्रिल-2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 3.84 टक्के नोंदवला गेला होता, जो मार्च-2023 मध्ये 4.79 टक्के इतका होता. वर्षभरापूर्वी एप्रिल-2022 हे प्रमाण 8.31 टक्के इतके होते. तृणधान्ये, दूध आणि फळे इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरून यावर्षी फेब्रुवारीमध्ये 6.4 टक्क्यांवर पोहोचली होती.

या वर्षात किरकोळ महागाई दर सलग चौथ्या महिन्यात घसरला आहे. खरे तर हा सलग तिसरा महिना आहे जेव्हा किरकोळ महागाई दर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पातळीवर समाधानकारक आहे.

रेपो रेटमध्ये बदल नाही

गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ महागाई दरात घट होत असताना, गेल्या दोन पतधोरण बैठकीत रेपो रेट न वाढवण्याचा निर्णय देखील रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे. याचाच अर्थ देशातील महागाई नियंत्रणात आली आहे. आरबीआयच्या फ्रेमवर्कनुसार किरकोळ महागाई दर 2 ते 4 टक्क्यांवर असणे गरजेचे आहे. सध्याचा महागाईचा दर लक्षात घेता सामन्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.  

महागाई संदर्भात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास पुढील पतधोरण बैठकीत रेपो दर कमी करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेतला जाऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज व इतर कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या व्याजाच्या हफ्त्यात (EMI) घट होऊ शकते.