डिलिव्हरी बॉयसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑनलाइन अन्न आणि पेये ऑर्डर करण्याची सुविधा पुरवणाऱ्या झोमॅटो (Zomato) ने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी रेस्ट पॉइंट्स तयार करण्याची घोषणा केली आहे. हे सार्वजनिक निवारे असतील जेथे डिलिव्हरी एजंट विश्रांती घेऊ शकतील आणि ताजेतवाने होऊ शकतात.
झोमॅटोच्या द शेल्टर प्रोजेक्ट अंतर्गत, डिलिव्हरी एजंट्सच्या सोयीसाठी रेस्ट पॉइंट्स तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत, कंपनीद्वारे डिलिव्हरी एजंट्ससाठी सुरक्षित आणि अधिक उपयुक्त वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षित आहे. झोमॅटो (Zomato) च्या CEO ने डिलिव्हरी एजंट्ससाठी रेस्ट पॉइंट्स तयार करण्याची घोषणा केली आहे. हे सार्वजनिक रेस्ट पॉइंट असतील जेथे डिलिव्हरी एजंट विश्रांती घेऊ शकतात आणि रीफ्रेश होऊ शकतात. विशेष म्हणजे स्विगी सारख्या इतर कंपन्यांचे डिलिव्हरी एजंट देखील या रेस्ट पॉइंटना भेट देऊ शकणार आहेत. कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
कामात सुधारणा होण्यास मदत होईल
ब्लॉगपोस्टमध्ये या उपक्रमाची घोषणा करताना, दीपिंदर गोयल म्हणाले की डिलिव्हरी पार्टनर हे त्यांच्या व्यवसायाचे "हृदय आणि आत्मा" आहेत. ते म्हणाले की, "आमच्या डिलिव्हरी पार्टनर्सचे काम कठीण आहे आणि त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करण्यासाठी आमच्याकडे कोणतीही सार्वजनिक पायाभूत सुविधा नाही,". हे रेस्ट पॉइंट्स झोमॅटो (Zomato)च्या द शेल्टर प्रकल्पाचा भाग आहेत, ज्याद्वारे कंपनी डिलिव्हरी एजंट्ससाठी अधिक सुरक्षित आणि अधिक सहाय्यक वातावरण निर्माण करण्याची आशा करते. झोमॅटोचे मुख्यालय असलेल्या गुरुग्राममध्ये दोन रेस्ट पॉइंट्स आधीपासूनच सुरु आहेत.
डिलिव्हरी पार्टनर्सना विश्रांतीसाठी जागा मिळेल
“आमचा विश्वास आहे की आम्ही सर्व डिलिव्हरी पार्टनर्सना आराम करण्यासाठी, रिचार्ज करण्यासाठी आणि स्वतःसाठी काही क्षण घालवण्यासाठी एक चांगले वातावरण तयार करू शकतो. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा फायदा होईल."
या सुविधा असतील
गोयल म्हणाले की, या रेस्ट पॉइंट्समध्ये हाय-स्पीड वायफाय, फर्स्ट एड किट, फोन चार्जिंग स्टेशन्स, झोमॅटोच्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी वॉशरूम आणि पिण्याचे पाणी असेल. गोयल म्हणाले की स्विगी सारख्या इतर कंपन्यांचे डिलिव्हरी एजंट देखील या रेस्ट पॉइंट्सवर येऊ शकतील.