Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Retail: शॉपिंग झाली सोपी! रिलायन्स रिटेल स्टोअरमध्ये 'डिजिटल रुपी' पेमेंटची सुविधा

digital rupee

रिलायन्स रिटेल शॉपिंग सेंटर्सवरील खरेदी आता आणखी सोपी झाली आहे. शॉपिंगचे बील तुम्ही डिजिटल रुपीने पे करू शकता. देशभरातील रिलायन्स शॉपिंग सेंटर्समध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच डिजिटल रुपी पेमेंट सुविधा भारतामध्ये लाँच केली असून त्याचा आता प्रसार सुरू झाला आहे.

Reliance Retail digital rupee Payment mode: रिलायन्स रिटेल शॉपिंग सेंटर्सवरील खरेदी आता आणखी सोपी झाली आहे. शॉपिंगचे बील तुम्ही डिजिटल रुपीने पे करु शकता. देशभरातील रिलायन्स शॉपिंग सेंटर्समध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच डिजिटल रुपी पेमेंट मोड भारतामध्ये लाँच केला असून त्याचा आता प्रसार सुरू झाला आहे. सध्या भारतामध्ये UPI द्वारे होणाऱ्या पेमेंट्ची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आता डिजिटल रुपी ही वेगाने पुढे येत आहे.

डिजिटल रुपीचे व्यवहार करण्यासाठी रिलायन्स रिटेलने ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक आणि fintech Innoviti Technologies या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. त्याद्वारे हे पेमेंट्सचे सर्व व्यवहार होणार आहेत. अनेक ग्राहक डिजिटल पेमेंटचा पर्याय स्वीकारतात. मात्र, हे पेमेंट करताना आम्ही ग्राहकांना आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे, असे रिलायन्स रिटेलचे प्रमुख व्ही. सुब्र्हमन्यम यांनी म्हटले आहे.

डिजिटल रुपी काय आहे( What is digital rupee)

बँकांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्याकडचे रोख पैसे किंवा तुमच्या खात्यातले पैसे देऊन तुम्ही डिजिटल रुपये विकत घेऊ शकता. सध्या चलनात असलेल्या नोटा आणि डिजिटल रुपी यांचं मूल्य सारखंच असेल. (तुमच्याकडे असलेल्या एका रुपयासाठी तुम्हाला एक रुपये मूल्याचा डिजिटल रुपीच मिळणार). फक्त डिजिटल रुपी तुम्हाला मिळणार तो टोकनच्या स्वरुपात. आणि तुमचे डिजिटल रुपये साठवण्यासाठी बँक तुम्हाला एक डिजिटल वॉलेट उपलब्ध करून देईल.

नोटेवर रिझर्वह बँकेच्या गव्हर्नरांचं एक वाक्य असतं, ‘मै धारकको पैसे अदा करनेका वचन देता हूँ!’ म्हणजे ज्याच्या हातात नोट असेल तो तिचा मालक असतो आणि त्याच्याकडे त्या मूल्याचं चलन आहे असं गृहित धरलं जातं. तसंच टोकनचंही आहे. ज्याच्याकडे टोकन असेल तो तितक्या मूल्याच्या डिजिटल रुपींचा मालक असेल.

कसा वापरायचा डिजिटल रुपी? (How to Use E-Rupee)

तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचे असतील किंवा एखादी वस्तू खरेदी करायची असेल तरी डिजिटल रुपी तुम्हाला वापरता येईल. याला पी-टू-पी P2P (person to person) किंवा पी-टू-एम P2M (पर्सन टू मर्कंटाईल) व्यवहार म्हणतात. मित्राला पैसे देण्यासाठी तुमच्याकडे असलेलं टोकन तुम्ही तुमच्या मित्राच्या वॉलेटमध्ये हस्तांतरित करू शकता. तर दुकानदार किंवा व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी क्यू-आर कोड वापरावा लागेल.