Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance JioBook: लॅपटॉप मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, इतर ब्रॅंडचा बँड वाजणार

Jio Book

Reliance JioBook: भारतात स्मार्टफोन, लॅपटॉप या गॅझेट्सची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्रीजने या मार्केटकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने Jio Book चे अद्यावत व्हर्जन तयार केले आहे.

देशातील सगळ्यात मोठा उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीज लॅपटॉप मार्केटमध्ये नव्याने एन्ट्री घेण्यास सज्ज झाला आहे. येत्या 5 ऑगस्ट 2023 Reliance Jio Book चे अपडेटेड व्हर्जन अवघ्या 16499 रुपयांना प्री बुक करता येणार आहे.  Jio Book मुळे Dell, HP, Lenevo, Asus या सारख्या बड्या ब्रॅंड्सच्या मनात धडकी भरली आहे. जिओ टेलिकॉम सेवेप्रमाणेच लॅपटॉप इंडस्ट्रीजमध्ये नजीकच्या काळात स्पर्धा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

भारतात स्मार्टफोन, लॅपटॉप या गॅझेट्सची प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच रिलायन्स इंडस्ट्रीजने या मार्केटकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने Jio Book चे अद्यावत व्हर्जन तयार केले आहे. बजेट प्राईसमध्ये Jio Book लॉंच केल्याने सुरुवातीला Jio Book शैक्षणिक वापरासाठी असेल. मात्र यामुळे बाजारातील ग्राहकांचा प्रतिसाद आणि इतर स्पर्धक कंपन्यांच्या उत्पादने याबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचा अभ्यास करता येणार आहे. यावरुन  भविष्यात लॅपटॉपची श्रेणी विस्तारण्याचा प्रयत्न रिलायन्सकडून केला जाणार आहे.

आकडेवारीचा विचार केला तर वर्ष 2022मध्ये भारतातील लॅपटॉप मार्केटची उलढाल 5.5 बिलियन डॉलर्स इतकी आहे. मागील काही वर्ष या उद्योगात सरासरी 7% ने वाढ झाली आहे.  ईएमआर या संस्थेच्या अहवालानुसार 2028 पर्यंत लॅपटॉपचे मार्केट 2028 पर्यंत 6.7% ने वाढून 8.1 बिलियन डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

JioBook 4G हा प्रत्येकासाठी वापरता येईल, असे डिव्हाईस आहे, असा दावा रिलायन्सने केला आहे.यात जिओ ऑपरेटिंग सिस्टम असून HDMI Mini Port, 5000 mAh बॅटरी बॅकअप आहे. 4 जीबी रॅम, 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह क्लाऊड स्टोरेजचा देखील पर्याय देण्यात आला आहे. JioBook ची किंमत 16499 रुपये असून हा लॅपटॉप अॅमेझॉन, रिलायन्स डिजिटल या ई-कॉमर्स वेबसाईटवर प्री बुक करता येईल.

रिलायन्सचीआक्रमक स्ट्रॅटेजी इतर ब्रॅंड्ससाठी ठरेल अडचण

रिलायन्सने यापूर्वी टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओ लॉंच केले होते. तेव्हा ग्राहकांना जवळपास दीड वर्ष मोफत सेवा दिली होती. त्यातून जिओने 30 कोटी ग्राहकांना आकर्षित केले होते. जिओच्या स्पर्धेपुढे युनिनॉर, डोकोमो सारख्या टेलिकॉम कंपन्या बंद झाल्या. जिओच्या वादळापुढे एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन यांचाही टिकाव लागला नाही. आताही जिओ लॅपटॉपसाठी रिलायन्सने आक्रमक स्ट्रॅटेजी केली तर इतर बड्या ब्रॅंड्ससाठी अडचणीचे ठरु शकते.