Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिलायन्स जिओकडून JioBook लॅपटॉप लॉन्च; 16499 रुपयात मिळताहेत दमदार फीचर्स

रिलायन्स जिओकडून JioBook लॅपटॉप लॉन्च; 16499 रुपयात मिळताहेत दमदार फीचर्स

रिलायन्सचा आकर्षक डिझाइनचा जिओबुक लॅपटॉप ब्लू शेडमध्ये उपलब्ध असून तो केवळ 16,499 रुपयात खरेदी करता येणार आहे. बाजारातील इतर ब्रँडच्या तुलनेत सर्वात परवडणारा लॅपटॉप असल्याने ग्राहकांमध्ये या लॅपटॉप बद्दल जास्तच क्रेझ निर्माण झाली आहे.

जिओचे प्रोडक्ट म्हणजे काही तरी नाविन्यपूर्ण आणि धमाकेदार असे एक गृहितक सध्या मार्केटमध्ये निर्माण झाले आहे. त्याच प्रमाणे रिलायन्स जिओचा (Reliance Jio) बहुचर्चित लॅपटॉप JioBook Version-2 laptop हा सोमवारी (31 जुलै) लॉन्च करण्यात आला आहे. वजनाने हलका आणि कमी किमतीचा हा लॅपटॉप अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे. भारतीयांच्या गरजा समोर ठेवूनच कंपनीने हे भारतातील हे पहिले लर्निंग बुक लॉन्च केले आहे. 4G कनेक्टिव्हिटी असलेला हा लॅपटॉप ग्राहकांना 5 ऑगस्टपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

दमदार फीचर्स 

JioBook या आकर्षक लॅपटॉपला 11.6 इंचाचा एचडी डिस्पले देण्यात आला आहे. तर लॅपटॉपमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत स्टोरेज क्षमता वाढवता येते. या लॅपटॉपचे वजन 990 ग्रॅम आहे, ज्यामुळे युजर्सला अगदी सहजपणे लॅपटॉप हाताळता येईल. जिओ बुक  लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G ड्युअल बँड वाय-फाय, 2 यूएसबी पोर्ट, 1 मिनी-एचडीएमआय पोर्ट, हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.0 ची सुविधा देण्यात आली आहे. लॅपटॉपमध्ये 4,000mAh बॅटरी आहे. तसेच एकदा चार्ज केल्यास याची बॅटरी 8 तास टिकू शकते असा दावा जिओकडून करण्यात आला आहे.

16499 रुपये वाजवी किंमत

या लॅपटॉपमध्ये HD वेबकॅम देण्यात आला आहे. याशिवाय स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला वायरलेस कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच हा एक्सटर्नल डिस्प्लेला देखील कनेक्ट करता येऊ शकतो. हा अनेक फिचर्सने सुसज्ज असा लॅपटॉप ग्राहकांनी वाजवी किमतीत म्हणजे 16,499 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना हा रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरमधून ऑनलाइन अथवा ऑफलाइन देखील खरेदी करता येणार आहे. याशिवाय Amazon या ई कॉमर्स वेसाईटवरून देखील तुम्हाला हा ऑर्डर करता येणार आहे.

रिलायन्सचा आकर्षक डिझाइनचा  जिओबुक लॅपटॉप ब्लू शेडमध्ये उपलब्ध असून तो केवळ 16,499 रुपयात खरेदी करता येणार आहे. इतर ब्रँडच्या तुलनेत बाजारातील सर्वात परवडणारा लॅपटॉप असल्याने ग्राहकांमध्ये या लॅपटॉप बद्दल जास्तच क्रेझ निर्माण झाली आहे.