Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio new Data Plans: जिओकडून दोन नवे प्लॅन जाहीर, 2.5 GB इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

Jio new Data Plans

Image Source : www.bgr.in.com

रिजिओने ग्राहकांसाठी न्यू इअर ऑफरही सुरू केली आहे. 2023 रुपये आणि 2,999 रुपयांचे दोन प्लॅन कंपनीने याआधी आणले आहेत. तसेच 5G ची वेलकम ऑफरही ग्राहकांना देण्यात येत आहे.

Jio New Data plans: रिलायन्स जिओ कंपनीने ग्राहकांसाठी दोन नवे प्लॅन आणले आहेत. यामध्ये जास्त इंटरनेट डेटा ग्राहकांना देण्यात येत आहे. जिओचे हे प्लॅन ग्राहकांना वेबसाईट, जीओ अॅप आणि विविध ऑनलाइन रिचार्ज आणि बिल्स पेमेंट प्लॅटफॉर्म्सवरती उपलब्ध असणार आहेत.

जिओ ₹349 plan

जिओने 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन 349 रुपयांमध्ये आणला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदीन 100 मेसेजेस देण्यात आले आहेत. जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, सिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचे अतिरिक्त बेनिफिट्स या प्लॅनसोबत देण्यात आले आहेत. दरदिवशी 2.5 जीबी म्हणजेच दरमहिन्याला 75 जीबी डेटा या प्लॅनमधून ग्राहकांना मिळेल.

जिओ ₹899 plan

जिओने 90 दिवसांच्या वैधतेसाठी 899 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्येही प्रतिदीन 2.5 GB डेटा येण्यात येत आहे. तसेच 100 SMS प्रतिदिन आणि जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडचे अतिरिक्त बेनिफिट्स प्लॅनसोबत देण्यात आले आहेत. 90 दिवसांसाठी ग्राहकांना तब्बल 225 जीबी डेटा मिळणार आहे.

न्यू इयर प्लॅन ऑफर्स( Jio New year plan offer)

जिओने ग्राहकांसाठी न्यू इअर ऑफरही सुरू केली आहे. 2023 रुपये आणि  2,999 रुपयांचे दोन प्लॅन कंपनीने याआधी आणले आहेत. तसेच 5G ची वेलकम ऑफरही ग्राहकांना देण्यात येत आहे.

जिओ 2023 रुपयांचा New Year Plan

नव्या वर्षात जिओने ग्राहकांसाठी 2023 रुपयांत हा प्लॅन आणला आहे. या प्लॅनद्वारे ग्राहकांना 252 दिवसांसाठी 630 जीबी डेटा मिळेल. दररोज वापरासाठी 2.5 जीबी ग्राहकाच्या खात्यावर जमा होईल. डेली लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदीन 100 मेसेज देण्यात आले आहेत. यासोबत नव्याने प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांसाठी जिओ प्राइम सबस्क्रिप्शन देण्यात येणार आले आहे.

2,999 Jio plan

2023 रुपयांच्या प्लॅनमध्ये जे बिनिफिट्स आहेत तेच या प्लॅनमध्ये देण्यात आले आहेत. मात्र, या प्लॅनची वैधता 365 दिवसांची म्हणजेच एक वर्षाची आहे.