Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

e-Rupee ने विमा प्रीमियम भरता येणार, रिलायन्स जनरल इन्श्युरन्स ठरली देशातली पहिली कंपनी

e-RUPI

QR कोड-आधारित ही पेमेंट सिस्टम येणाऱ्या काळात मोठा बदल घडवेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. नेमकी हीच बाब ओळखून रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) या विमा कंपनीने ई-रुपीमध्ये पेमेंट स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे. पेमेंटसंदर्भात असा निर्णय घेणारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी ही देशातली पहिली कंपनी ठरली आहे हे विशेष!

e-Rupee हे ऑगस्ट 2021 मध्ये भारत सरकारने डिजिटल पेमेंट सोल्यूशन लॉन्च केले आहे. खरे तर नोटबंदीनंतर भारतीय लोक डिजिटल पेमेंटकडे वळले असले तरी ई-रुपीबद्दल अजूनही सर्वसामान्य नागरिकांना माहिती नाही. सध्या प्रायोगिक तत्वावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना ई-रुपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. QR कोड-आधारित ही पेमेंट सिस्टम येणाऱ्या काळात मोठा बदल घडवेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. नेमकी हीच बाब ओळखून रिलायन्स जनरल इन्शुरन्स (Reliance General Insurance) या विमा कंपनीने ई-रुपीमध्ये पेमेंट स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे. पेमेंटसंदर्भात असा निर्णय घेणारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी ही देशातली पहिली कंपनी ठरली आहे हे विशेष!

येस बँकेसोबत भागीदारी

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स ई-रुपीत प्रीमियम घेण्यासाठी येस बँकेसोबत करार केला आहे. ई-रुपीमध्ये व्यवहार करण्यासाठी काही निवडक बँकांना आरबीआयने परवानगी दिली आहे. त्यापैकी एक येस बँक आहे. भविष्यात ई-रुपीच्या नव्या पेमेंट क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल होणार आहेत हे ओळखून विमा कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

e-RUPI पेमेंट पद्धत कशी कार्य करेल?

बँक ऑफ इंडिया (Bank of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), येस बँक (Yes Bank) आणि आयडीएफसी फर्स्ट बँक  (IDFC First Bank) या प्रमुख चार बँकांना प्रायोगिक तत्वावर e-Rupee सुविधा देण्यासाठी आरबीआयने संमती दिली आहे. पैकी रिलायन्स जनरल इन्शुरन्सचा येस बँकेशी विमा प्रीमियम संबंधित करार झाला असल्याकारणाने येस बँकेत e-Rupee खाते असलेल्या ग्राहकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. येस बँकेत सक्रिय ई-वॉलेट (E Wallet) असलेले ग्राहक त्वरित पेमेंट (Instant Payment) करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्सचा ई-रुपे (e Rupay) क्यूआर कोड स्कॅन करू शकतात.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मते, या पेमेंट पद्धतीचा उद्देश ग्राहकांना सुलभ, सुरक्षित, झटपट आणि ग्रीन पेमेंट सोल्यूशन उपलब्ध करून देणे हा आहे. ग्राहकांची कुठलीही आर्थिक फसवणूक होऊ नये आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित व्हावेत असा या सुविधेमागील उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

डिजिटल पेमेंट सुविधा देण्याची स्पर्धा 

रिटेल डिजिटल रुपया 1 डिसेंबर 2022 रोजी मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वर येथे लॉन्च करण्यात आला आहे. या सुविधेचा विस्तार इतर शहरांमध्ये हळूहळू करण्याची सरकारची योजना आहे. परंतु डिजिटल रुपयाला भारतीय सामान्य नागरिक किती पसंती दर्शवतात याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. पेटीएम, जी-पे, रेझर-पे अशा वेगवगेळ्या डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या  कंपन्या सध्या कार्यरत असताना e-Rupee ला लोक किती प्रतिसाद देतात हे येणाऱ्या काही वर्षात स्पष्ट होणारच आहे. परंतु सध्याच्या डिजिटल पेमेंटचा अजून ग्रामीण भागात पुरेसा प्रसार झालेला नाही, त्यामुळे e-Rupee ला ग्रामीण भागात कितीसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहण्यासारखे असेल.

ई-रुपी हे एक डिजिटल टोकन आहे जे भारतीय चलनी नोटेच्या समतुल्य आहे, म्हणजेच त्याला कायदेशीर आधार देखील आहे. परंतु हे चलन डिजिटल असून प्रत्यक्षात रोख रकमेने व्यवहार यांत करता येणार नाही.  मनी लाँडरिंगसारख्या आर्थिक गैरव्यवहारांच्या शक्यता कमी करण्यासाठी हे चलन आणल्याचे आरबीआयने म्हटले आहे.