Refund on flight Tickets : कोविड काळानंतर विमा प्रवासाच्या तिकीट बुक करतेवेळी रिफंड हा पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. कोविडपूर्व काळात 10 टक्के प्रवासी ही रिफंड हा पर्याय निवडत असत मात्र अलीकडे 25 टक्के प्रवासी हे तिकीट बुक करतानाच एअरलाईनकडून रिफंडचा पर्याय उपलब्ध असेल तर त्याची निवड करत आहेत.
कोविड महामारीच्या काळात सगळेच व्यवहार ठप्प झालेले. या काळात विमान प्रवांसाना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला. काही कंपन्यांकडून प्रवासांना थोड्या-फार प्रमाणात तिकीट रद्द करण्यावर परतावा देण्यात आला. मात्र, याचे प्रमाण नगण्य होते. या विषयावरून कोव्हिड काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते. या अनुभवानंतरच जेव्हा पुन्हा एकदा कोविड पुन्हा आपलं डोकं वर काढू लागला आहे तेव्हा काळजी म्हणून प्रवासीचं तिकीट बुक करताना अतिरिक्त शुक्ल भरून रिफंडचा पर्याय निवडत आहेत. कोविड पूर्व काळात अशाप्रकारे रिफंड पर्याय निवडणाऱ्यांचे प्रमाण हे 10 टक्के होते. तर आता यामध्ये वाढ होत 25 टक्के प्रवासी तिकीट रिफंडचा पर्याय निवडत आहेत.
विमान कंपन्यांचे रिफंड शुल्क
कोविड काळामध्ये विमान तिकीट रिफंडसाठी प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो पुन्हा करावा लागू नये. तसेच सहजरित्या प्रवाशांना रिफंडसाठी अर्ज करता यावा यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार विविध कंपन्यांनी काही नियमांसह रिफंडचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. तरी विमान तिकीट रद्द करण्याचे शुल्क हे खूप जास्त असते. त्यावर अनेक कंपन्यांनी प्रवाशांसाठी विविध ऑफर देण्याचे प्रयत्न केले आहेत.
विस्तरा कंपनी सुद्धा तिकीट बुक करतेवेळी 3 हजार रूपये अधिक शुल्क आकारून तुम्हाला रिफंडचा पर्याय देते. तसेच .इंडिगो एअरलाईसुद्धा तिकीट रद्द केल्यास 3 हजार रूपयाचे शुल्क प्रवाशांकडून आकारते.
ट्रॅव्हल एजंटचे पर्याय
क्लिअरट्रिप या कंपनीकडून तुमच्या प्रवास तिकीटाच्या 10 टक्के रक्कम ही तिकीट बुक करतेवेळी जमा करुन घेतली जाते. म्हणजे तुमच्या तिकीटामधून 200 ते 500 रूपये कापून तुम्हाला बाकीचे पैसे परत मिळतात. त्यामुळे तुम्ही काही कारणास्तव शेवटच्या क्षणी सुद्धा तुमचा प्रवास रद्द केला तरी तुमचे पैसे परत मिळवू शकता.
जर तुम्ही मेक माय ट्रिप या संकेतस्थळावरून तुमची ट्रिप प्लान करत असाल आणि विमान तिकीट बुक केलं असेल तर दर तिकीटावर 99 रूपयाचे तिकीट रद्द करण्यासंबंधीचे शुल्क आकारले जाते. मात्र यामध्ये तुम्हाला विमान प्रवासा सुरू होण्याच्या 24 तास आधी तुमचं तिकीट रद्द करावं लागतं. यात्रा डॉट कॉम कडून तर 30 एप्रिलपर्यंत फ्री तिकीट कॅन्सलेशनचा पर्याय देण्यात आला आहे.