Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redmi Buds 4 Active launch in India: भारतात शाओमीचे नवीन इअरबड्स लॉन्च; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Redmi Buds 4 Active launch in india

Image Source : www.twitter.com

Redmi Buds 4 Active launch in India: शाओमीने भारतात त्यांचे नवीन इअरबड्स (Earbuds) लॉन्च केले आहेत. हे इअरबड्स सर्वोत्तम बॅटरी क्षमतेसह उत्तम साउंड क्वालिटी देण्यासाठी सक्षम आहेत. या इअरबड्सचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Redmi Buds 4 Active launch in India: इलेट्रॉनिक क्षेत्रातील नामांकित चायना कंपनी शाओमीने (Xiaomi) भारतात त्यांचे नवीन इअरबड्स (Earbuds) लॉन्च केले आहेत. या इअरबड्सचे नाव आहे, 'Redmi Buds 4 Active'. हे इअरबड्स सर्वोत्तम बॅटरी क्षमतेसह उत्तम साउंड क्वालिटी (Best Sound Quality) देण्यासाठी सक्षम आहेत. सध्या या नवीन इअरबड्सची सगळीकडेच चर्चा आहे. बजेट फ्रेंडली ओळखल्या जाणाऱ्या या इअरबड्सचे  फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

'Redmi Buds 4 Active' चे फीचर्स जाणून घ्या

शाओमी कंपनीने लॉन्च केलेले 'Redmi Buds 4 Active' हे इअरबड्स ब्लूटूथ कनेक्ट वायरलेस डिव्हाईस (Bluetooth Connect Wireless Device) आहे. यामध्ये ब्ल्यूटुथ 5.3 फीचर्स देण्यात आले आहे. ज्याला IPX4 रेटिंग देण्यात आले आहे.या इअरबड्सला स्टेम डिझाईन देण्यात आली आहे. ऑडिओ कॉल, व्हॉइस असिस्टंट यासारखे फीचर्स नवीन इअरबड्समध्ये दिले आहेत.

यामध्ये 12mm डायनॅमिक ड्राईवर्स देण्यात आले असून ENC फिचर देखील दिले आहे. या नवीन इअरबड्समध्ये लो लेटेंसी गेमिंग मोड (low latency gaming mode) देण्यात आला आहे. Xiaomi कडून असे सांगण्यात आले आहे की, हे ब्ल्यूटुथ इअरबड्स गुगल फास्ट पेअर फिचर सोबत काम करतात. ज्यामुळे ते पटकन कोणत्याही ब्ल्यूटुथ सोबत कनेक्ट होतात.

हा इअरबड्स 3.6 ग्रॅम वजनाचा आहे.  यामध्ये 34mAh बॅटरी क्षमता असून एकदा चार्ज केल्यावर 5 तास याची बॅटरी लाईफ चालते. पूर्ण चार्ज करण्यासाठी साधारण 90 मिनिटांचा वेळ द्यावा लागतो. हा इअरबड्स ब्लॅक (Black) आणि व्हाईट (White) रंगात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

किंमत जाणून घ्या

कंपनीचा हा नवीन TWS इअरबड्स आहे. याची किंमत 1399 रुपये असून सध्या कंपनीकडून यावर डिस्काउंट देण्यात येत आहे. कंपनीच्या सेलमध्ये हे इअरबड्स 1199 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येतील. खरेदी करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 असणार आहे.

'Redmi Buds 4 Active' चा सेल 20 जून पासून सुरू होणार आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाईन रिटेल वेबसाईट अमेझॉनवरून (Amazon) खरेदी करु शकतात.

Source: amarujala.com