Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: 'या' स्मार्टफोवर मिळतोय 500 रुपयांचा त्वरित डिस्काउंट आणि 2 वर्षांची वॉरंटी

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023

Image Source : www.mi.com

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने (Xiaomi) Redmi A2 आणि Redmi A2+ हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. त्यानंतर कंपनीने पहिलाच सेल आजपासून (23 मे 2023) सुरू केला आहे. या निमित्ताने मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल जाणून घेऊयात.

सध्या स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध झाल्याने त्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. चायनाची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने (Xiaomi) कंपनीचे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. Redmi A2 आणि Redmi A2 + या दोन स्मार्टफोनसाठी कंपनीने आज (23 मे 2023) दुपारी 12 पासून सेल सुरू केला आहे. हे दोन्ही फोन बजेट फ्रेंडली असून सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे आहेत.विशेष म्हणजे या मोबाईलच्या खरेदीनंतर ग्राहकांना त्वरित डिस्काउंट दिला जात आहे. त्यानिमित्ताने Redmi A2 आणि Redmi A2 + या दोन स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Redmi A2 आणि Redmi A2 + स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घ्या

Redmi A2 आणि Redmi A2 + या दोन स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 1600×720 पिक्सलचे एचडी+ रेजोल्युशन, 60 हर्ट्स रिफ्रेश रेट आणि 120 हर्ट्स टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन android 13 एडिशनवर काम करतात.

Redmi A2 आणि Redmi A2 + या  दोन्ही फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच हे दोन्ही फोन्स Helio G36 चिपसेटसह देण्यात येत आहेत.

Redmi A2 आणि Redmi A2 + या  स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय 5000mAh ची बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. हा फोन चार्ज करण्यासाठी 10W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या दोन फोनमध्ये एक  महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे Redmi A2 + फोनमध्ये ग्राहकांना रियर फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

काय आहे Redmi A2 ची किंमत

2GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेला Redmi A2 साठी ग्राहकांना 6,299 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 2GB रॅम आणि 64GB स्टोरेजसाठी 7,999 रुपये मोजावे लागतील. 
ग्राहकांनी Redmi A2 मोबाईल आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) किंवा अ‍ॅक्सिस बँकेच्या(Axis Bank) कार्डवरून खरेदी केल्यावर त्यांना त्वरित 500 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे.

Redmi A2+ ची किंमत आणि ऑफर

Redmi A2+ च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनसाठी ग्राहकांना 8,499 रुपये मोजावे लागतील. क्लासिक ब्लॅक,सी ग्रीन या दोन रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे. Redmi A2 आणि Redmi A2+ या दोन्ही फोनवर कंपनीकडून 2 वर्षाची वॉरंटी (2-year warranty) देण्यात येत आहे. मात्र ही ऑफर लिमिटेड पिसेससाठीच वैध असणार आहे.

स्मार्टफोन कुठून खरेदी करता येतील?

Redmi A2 आणि Redmi A2+ हे दोन्ही फोन ग्राहक Mi स्टोअर अँप, अमेझॉन इंडिया, कंपनीच्या Mi.com या वेबसाईटवरून आणि ऑफलाईन स्टोअर्समधून देखील खरेदी करू शकतील. 

Source: navbharattimes.indiatimes.com