Realme C53 : रिअलमी इतर स्मार्टफोन ब्रँडला सतत टक्कर देत असते. कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत Realme Nazo 60 सिरिज नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आता कंपनीने आणखी एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. Realme पुढील आठवड्यात नवीन स्मार्टफोन Realme C53 लॉन्च करणार आहे. तो Realme C सिरिजमधील असणार आहे. कंपनीने त्याची लॉन्चिंग डेटही जाहीर केली आहे.
कंपनी 19 जुलै रोजी Realme C53 लाँच करणार आहे. हा मिड रेंज बजेट सेगमेंट स्मार्टफोन असणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर देखील listed आहे. लॉन्चपूर्वीच त्याचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यामध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 108 मेगापिक्सेल कॅमेरा देणार आहे. एवढ्या उच्च मेगापिक्सेल कॅमेरासह येणारा Realme C सिरिजमधील हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. जाणून घेऊया त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल.
Realme C53 चे डिझाइन आयफोनसारखे असेल
Realme ने Realme C53 ला अतिशय आकर्षक डिझाइन दिले आहे. त्यात तुम्हाला आयफोनची झलकही पाहायला मिळेल. याच्या मागील कॅमेरा मॉड्युलची रचना आयफोनप्रमाणे करण्यात आली आहे. त्याची शैली, कार्यक्षमता आणि नावीन्य हे इतर स्मार्टफोनपेक्षा चांगले बनवते. Realme ने हा स्मार्टफोन आधीच मलेशियामध्ये लॉन्च केला आहे. आता ते भारतात लॉन्च केले जाऊ शकते.
Realme C53 चे डिटेल्स
- Realme C53 मध्ये ग्राहकांना 6.4-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
- डिस्प्लेमध्ये 90Hz चा स्मूथ रीफ्रेश दर दिला जाईल.
- हे आगामी प्रॉडक्ट Unisoc चिपसेटवर काम करते.
- यामध्ये यूजर्सना 4GB + 64GB आणि 6GB + 128GB चे दोन ऑप्शन मिळतील.
- कंपनी हा स्मार्टफोन गोल्स आणि ब्लॅक या दोन कलरमध्ये लॉन्च करू शकते.
- यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरीमध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
- कंपनीचा दावा आहे की तुम्ही केवळ 52 मिनिटांत 50 टक्के चार्ज करू शकता.