Realme C53 Discount : 'Realme' उद्या भारतात आपला नवीन स्मार्टफोन 'Realme C53' लॉन्च करणार आहे. हे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटमध्ये listed केले गेले आहे, जिथे त्याची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनमध्ये 108-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो बजेट कॅटेगरीमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची प्रारंभिक विक्री देखील Realme ने जाहीर केली आहे, जी उद्या संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत चालणार आहे.
सुरवातीच्या खरेदीदारांना मिळणार सूट
Realme च्या मते, 19 जुलै रोजी भारतात संध्याकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान 'Realme C53' ची अर्ली बर्ड सेल होईल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हा डिवाइस फ्लिपकार्टवर देखील विक्रीसाठी आणला जाईल. कंपनी या फोनच्या सुरुवातीच्या खरेदीदारांना 6GB + 64GB व्हेरिएंटवर 1000 रुपयांची सूट देखील देत आहे. महाराष्ट्र टाइम्सने केलेल्या बातमीनुसार, लाँच होण्यापूर्वी, टिपस्टर अभिषेक यादवने स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटची किंमत शेअर केली आहे.
या फोनची किंमत 9,999 रुपये असू शकते. पण स्मार्टफोनची नेमकी किंमत अद्याप कंपनीने उघड केली नसल्याने हा फक्त अंदाज आहे. ICICI, HDFC आणि SBI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर EMI पर्यायांसह बँक ऑफर देखील उपलब्ध आहेत. या फोनच्या Flipkart वर दिलेल्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास तर हा कंपनीचा पहिला C सीरीज स्मार्टफोन असेल जो 108MP मुख्य कॅमेरा सह येईल.
Realme C53 फीचर्स काय असू शकतात?
Realme C53 मध्ये 6.4-इंचाचा LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. स्मार्टफोन Unisoc चिपसेटवर काम करू शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 4GB+64GB आणि 6GB+128GB मध्ये येईल. त्याच वेळी, कलर ऑप्शनमध्ये गोल्ड आणि ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन असू शकतात. Realme C53 ला 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की स्मार्टफोनसोबत 18W चा चार्जर उपलब्ध असेल, जो 52 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज करेल.