Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme C53 Early Bird Sale: रिअलमी कंपनीचा नवा स्मार्टफोन आज होणार लॉन्च; सेलमध्ये मिळवता येईल 1000 रुपयांचा डिस्काऊंट

Realme C53 Early Bird Sale

Realme C53 Early Bird Sale: रियलमी कंपनी आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आज लॉन्च करणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव 'Realme C53'असे आहे. या फोनची खरेदी फ्लिपकार्टवरील अर्ली बर्ड सेलमधून करता येईल. ज्यामध्ये ग्राहकांना एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवता येईल. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सध्या अनेक स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारपेठेत सक्रिय आहेत. ज्यामध्ये सॅमसंग (Samsung), नोकिया (Nokia), जिओ (Jio), ओपो (Oppo), विवो (Vivo), आणि रियलमी (Realme) इत्यादींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. रियलमी कंपनी आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आज लॉन्च करणार आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव 'Realme C53' असे आहे.

रियलमी कंपनीचा 'अर्ली बर्ड सेल 2023' (Early Bird Sale 2023) आज पासून लाईव्ह होणार आहे. या सेलमध्ये ग्राहक रियलमीचा नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात आणि त्यावर एक हजार रुपयांचा डिस्काउंट देखील मिळू शकतात. जर तुम्हाला हा नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर या सेलबाबत आणि नवीन स्मार्टफोन बाबत अधिक माहिती जाणून घ्या.

‘Realme C53’ चे फीचर्स जाणून घ्या

Realme C53 स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.74 इंचाचा असून आयपीएस एलईडी एचडी प्लस प्रकारातील आहे. या फोनमध्ये 560 nits चा पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे. यासह 90Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे.

Realme चा नवीन स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G57 GPU दिले गेले आहे. हा फोन Android 13 वर आधारित असून Realme UI 4.0 वर चालेल.

हा नवीन स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यामधील पहिला पर्याय हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर दुसरा पर्याय 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येणार आहे.

या फोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स स्वरूपात आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन 4G स्वरूपातील असून यामध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि टाईप- सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची असून 18W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट यामध्ये मिळणार आहे.

या फोनची अंदाजे किंमत 9000 पासून सुरू होईल. हा फोन परवडणाऱ्या किमतीत ग्राहकांना खरेदी करता येईल. आज संध्याकाळी 6 वाजता हा फोन लॉन्च होणार असून त्याची किंमत आपल्याला जाणून घेता येईल.

‘अर्ली बर्ड सेल’बाबत जाणून घ्या

रियलमी कंपनीचा अर्ली बर्ड सेल (Early Bird Sale 2023) ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून म्हणजेच 19 जुलैपासून संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. जो रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहील. या सेलमधून ग्राहक खरेदी करू शकतात. या सेलदरम्यान खरेदीदारांना Realme C53, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा फोन 1000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डवरून हा फोन खरेदी केला, तर ग्राहकांना 500 रुपयांचा डिस्काउंट आणि 500 रुपयांचे कुपन डिस्काउंट स्वरूपात दिले जाईल.

Source: jagran.com