Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Realme 10 Pro कोका-कोला एडिशनचं प्री-बुकिंग सुरू, कधी लॉन्च होणार? ते घ्या जाणून

Realme 10 Pro कोका-कोला एडिशनचं प्री-बुकिंग सुरू, कधी लॉन्च होणार? ते घ्या जाणून

Image Source : www.newsbytesapp.com

रिअलमी (Realme) आपल्या Realme 10 Pro 5G ची कोका-कोला आवृत्ती सादर करणार आहे. तत्पूर्वी स्पेशल एडिशनच्या खरेदीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर प्री-बुकिंग सुरू झाली आहे.

रिअलमी (Realme) आपल्या Realme 10 Pro 5G ची कोका-कोला आवृत्ती सादर करणार आहे. कंपनी 10 फेब्रुवारी रोजी कोका-कोला एडिशन सादर करणार आहे.  स्पेशल एडिशनच्या खरेदीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर प्री-बुकिंग सुरू झाली आहे. रिअलमीने Book Now बटणासह आगामी फोनची मायक्रोसाइट तयार केली आहे. फोन खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक या बटणावर क्लिक करून आगामी हँडसेटची प्री-ऑर्डर करू शकतात. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत बुकिंग सुरू राहणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनी या स्मार्टफोनचा टीझर रिलीज करत आहे. त्यामुळे तो बराच काळ चर्चेत आहे.

कंपनी देणार बक्षिसं

कोका-कोला एडिशन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना कंपनी बक्षिसं देणार आहे. कंपनी ग्राहकांना 200 रुपयांचे डिस्काउंट कूपन, 3W ब्लूटूथ स्पीकर, इलेक्ट्रॉनिक टूथब्रश, एक वॉच 2, एक Realme Coca-Cola फिगर आणि एक डिलक्स सेट बॉक्स देणार आहे. मात्र, कंपनीने यासाठी फ्री बुकिंगची मर्यादा निश्चित केली आहे. स्मार्टफोनच्या कोला-कोला एडिशनमध्ये रेग्युलर एडिशन प्रमाणेच फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. मात्र, फोनची रचना वेगळी असू शकते. टीज केलेल्या फोटोमध्ये फोनच्या मागील बाजूस ड्युअल-टोन डिझाइन पाहिले जाऊ शकते. कोका-कोला अक्षरांसह आयकॉनिक काळा आणि लाल रंग मागील बाजूस दिसू शकतो.

फुल एचडी डिस्प्ले

स्मार्टफोनला 6.72-इंच फुल एचडी + डिस्प्लेसह 120 Hz रिफ्रेश रेट मिळू शकतो. हे ड्युअल-सिम (नॅनो) ओरिएंटेड डिव्हाइस असेल, जे Android 13 वर बेस्ड Realme UI 4.0 वर चालते. Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition स्मार्टफोन 6nm Snapdragon 695 5G SoC सह सुसज्ज असू शकतो, जो Adreno A619 GPU आणि 8 GB LPDDR4X रॅमसह येतो.

ड्युअल कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यात 108MP Samsung HM6 मुख्य सेन्सर आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सर असेल. सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 16MP फ्रंट फेसिंग सेन्सर मिळू शकतो. स्मार्टफोनला 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की 20 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज होऊ शकते.