रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवा 8 जुलै 2023 पासून मुंबईतील मुख्यालयात सुरु होणार आहे. मागील दोन महिन्यात टोमॅटोच्या किंमतींनी किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईचा भडका उडाला होता. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवणार की जैसे थेच ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभर रेपो दरात वाढ केली होती. बँकेचा रेपो दर 6.5% इतका आहे. मात्र फेब्रुवारी 2023 पासून व्याजदर स्थिर ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला होता.
बँकेची दोन दिवसीय पतधोरण बैठक 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या दिवशी गव्हर्नर शक्तिकांत दास पतधोरण जाहीर करतील. महागाईचा जोर वाढला असला तरी दुसऱ्या बाजूला देशभरात मॉन्सूनने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल. परिणामी महागाई कमी होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
यंदाच्या पतधोरणात रिझर्व्ह बँक थांबा आणि वाट पहा या उक्तीप्रमाणे प्रमुख व्याजदर स्थिर ठेवेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जून महिन्यात ग्राहक मूल्यावर आधारित महागाईचा दर 4.81% इतका आहे. प्रमुख महागाई दर 5.1% इतका होता. मे मध्ये तो 5.2% इतका होता. जूनमध्ये महागाईमध्ये किरकोळ घसरण झाली होती.
मात्र काही राज्यांमध्ये अतिवृष्टीने महापूर आला होता. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. अल निनोचा परिणाम मॉन्सूनवर दिसून आला. आणखी काही महिने महागाईचा स्तर असाच राहण्याची शक्यता आहे. जूनमध्ये महागाईत अचानक वाढ झाल्याने बँकेला पुन्हा सावध केले आहे. कदाचित बँकेकडून रेपो दर वाढवला जाण्याची शक्यता आहे.
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते जूनमध्ये महागाईचा दर 5% होता. टोमॅटो आणि इतर खाद्य वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याने जुलैमधील महागाई 6% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ते पुढे म्हणाले की पहिल्या तिमाहीत जीडीपीचा दर 8% इतका अपेक्षित आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने देखील व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. हे सर्व घटक पतधोरण बैठकीच चर्चिले जातील, असे त्यांनी सांगितले.