Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI MPC Meeting: रेपो दरामध्ये वाढ होण्याची शक्यता!

RBI MPC Meeting: रेपो दरामध्ये वाढ होण्याची शक्यता!

RBI Monetary Policy Committee Meeting : रिझर्व्ह बॅंक इंडियाच्या चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee-MPC) ची बैठक बुधवारपासून सुरू झाली आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास हे शुक्रवारी (दि.5 ऑगस्ट) रेपो दराबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंक इंडिया (RBI)च्या चलनविषयक धोरण समिती (Monetary Policy Committee-MPC) ची बैठक बुधवारपासून (दि.3 ऑगस्ट) सुरू झाली आहे. या बैठकीत आरबीआय फेडरल रिझर्व्ह बॅंकेने वाढवलेले दर आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रेपो दरामध्ये (Repo Rate) वाढ करण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांच्याकडून शुक्रवारी (दि.5 ऑगस्ट) याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या एमपीसीच्या (MPC) बैठकीत आरबीआयने दोनदा रेपो दरात वाढ केली होती. 

रेपो दरात किती वाढ होऊ शकते?

तज्ज्ञांच्या मते, आरबीआय रेपो दरात 0.25 ते 0.50 टक्के या दरम्यान  वाढ करण्याची शक्यता आहे. यापूर्वी आरबीआयने दोन वेळा रेपो दरामध्ये (Repo Rate) वाढ केली होती. एप्रिलमध्ये आरबीआयने 0.40 बेसिस पॉईंटने तर जूनमध्ये 0.50 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. त्यामुळु सध्या आरबीआयचा रेपो दर 4.90 टक्के आहे. हा दर कोरोनापूर्व काळातील दराच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयला रेपो दरात वाढ करण्यास वाव असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्याचा महागाई दर!

जून महिन्यातील महागाई दर (Inflation Rate) 7.01 टक्के राहिला आहे. हा सलग सहावा महिना आहे; ज्यात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घालून दिलेल्या मुदतीपेक्षा महागाई दर त्याच्या वर राहिला आहे. जुलै महिन्याच्या महागाई दराचे आकडे अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. मे महिन्यामध्ये महागाई दर 7.04 टक्के तर एप्रिल महिन्यात तो 7.79 टक्के होता. त्याचबरोबर जून महिन्यात अन्न महागाई दर (Food Inflation Rate) 7.75 टक्के आणि मे महिन्यात 7.97 टक्के राहिला होता.

रिझर्व्ह बॅंकेच्या अनुमानापेक्षा महागाई अधिक!

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने 2022-23 या वर्षासाठी महागाई दर 5.7 टक्के निश्चित केला होता. पण त्यात बदलत्या परिस्थितीनुसार वाढ करून तो 6.7 टक्के असा जारी केला. पण 2022 या वर्षात सतत सहा महिने देशाचा महागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीच राहिला आहे. 

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (Monetary Policy Committee-MPC) बैठक दर दोन महिन्यांनी होत असते. या बैठकीत आरबीआय अर्थिक धोरणांबाबत निर्णय घेत असते. दरम्यान, आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास सर्व बॅंकांची कर्जे पुन्हा महाग होतील.