भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या महिन्यात एकूण 4 सहकारी बँकाना झटका दिला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला होता. त्यानंतर आज बँकेने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी दोन बँकाचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 असे एकूण 4 बँकांचे परवाने रद्द झाले आहेत.
Table of contents [Show]
वाई येथील हरिहरिश्वर बँकेचा परवाना रद्द
आरबीआयच्या कारवाईत कर्नाटकमधील तुमकुर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) वाई, जिल्हा सातारा येथील हरिहरेश्वर बँकेचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. दोन्हीही सहकारी बँकांकडे पुरेशा प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध नव्हते. तसेच दोन्ही बँका तोट्यात आल्या होत्या. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
बँकेचा व्यवहार बंद
आरबीआयने जारी केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, “भारतीय रिझर्व्ह बँकेने “हरिहरेश्वर सहकारी बँक लि., वाई, सातारा” यांचा परवाना रद्द केला आहे. परिणामी, 11 जुलैपासून बँकेने व्यवहार करणे बंद केले आहे. आरबीआयकडून महाराष्ट्र सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, यांना देखील बँक ही बंद करण्यात आल्याचा आदेश जारी करण्याचे आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.
खातेदारांना मिळणार रक्कम
हरिहरेश्वर सहकारी बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 99.96% ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळणार आहे. DICGC कायदा, 1961 च्या कलम 18A च्या तरतुदींनुसार एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 57.24 कोटी रुपये यापूर्वीच वितरीत करण्यात आली असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
यापूर्वी दोन बँकांचे परवाने रद्द-
या कारवाईपूर्वी आरबीआयने बुलढाण्याच्या मलकापूरस्थित शहरी सहकारी बँक लिमिटेड आणि बंगळुरू स्थित सुश्रुती सौहार्द सहकार बँकेचा परवाना रद्द केला आहे. या दोन आणि आज कारवाई करण्यात आलेल्या चारही बँकाचे व्यखाते धारकांनाहीयात आले आहेत. तसेच या बँकांना असणारे आर्थिक पाठबळ कमी झाल्यामुळे आणि त्या खातेधारकांनाही पूर्ण पैसे देण्यास असमर्थ ठरत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.