शेअर मार्केटमध्ये आज RBL Bank चा शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला. आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये 4.62% वाढ झाली. आज इंट्रा डे मध्ये आरबीएल बँकेचा शेअर 174.25 रुपयांपर्यंत वाढला. कालच्या सत्रात तो 166.55 रुपयांवर बंद झाला होता.
आरबीएल बँकेच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यात 135% वाढ झाली आहे. एकूणच बँकिंग क्षेत्रात तेजी असल्याने आरबीएल बँकेच्या शेअरला फायदा झाला आहे. 20 जून 2022 रोजी आरबीएल बँकेचा शेअर 74.15 रुपयांवर होता. तिथून या शेअरने तेजीची वाट धरली.
आरबीएल बँकेच्या एक वर्षाचा बेटा 1.80 आहे. गेल्या काही सत्रात या शेअरमध्ये दैनंदिन उलाढाल प्रचंड वाढल्याचे दिसून आले आहे. इंडेक्सच्या तुलनेत हा शेअर अधिक जोखमीचा बनला आहे. आरबीएल बँकेचा आरएसआय 60.6 आहे. मागील तीन सत्रात हा शेअर 14.14% ने वाढला आहे. आरबीएलचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत अधिक किंमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजार विश्लेषकांच्या मते या शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. या शेअरमध्ये अजूनही वाढण्याची क्षमता आहे. बँकेच्या नफ्यात सप्टेंबरच्या तिमाहीत 201.55 कोटींचा नफा झाला होता.