नोकरदारांना अनेकवेळा आपल्या पगार पत्रकाची आवश्यकता भासते. ती मिळवण्यासाठी कंपनीला ईमेल करणे किंवा कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या HRMS वरून डाऊनलोड करून घ्यावी लागते. दरम्यान, आता रेझरपे सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता आपल्या पेरोल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्हाटस्अॅपवर पेस्लीप (Payslip)डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेझरपे आपल्या ग्राहक कंपन्यांना ही सुविधा पुरवणार आहे.
रिम्बर्समेंटचीही सुविधा
अनेक कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगार पत्रकाचे व्यवस्थापन करण्यासाठी RazorpayX या सॉफ्टवेअरच्या सिस्टमचा वापर करतात. दरम्यान, आता RazorpayX यांनी आपल्या ग्राहक कंपन्यांना आपल्या पेरोल प्लेटफॉर्मवर व्हाटसअॅपच्या माध्यमातून पे स्लीप डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. याच बरोबर कंपनीकडून रिम्बर्समेंटसाठी देखील आता व्हाट्सॅपच्या माध्यमातून विनंती अर्ज दाखल करता येणार आहे.
स्टार्टअप कंपन्यांसाठी सुविधा सुरू-
RazorpayX कडून सुरुवातीला काही स्टार्टअप कंपन्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या माध्यमातून संबंधित कंपनीचे कर्मचारी व्हाटसअॅपवर आपले पगारपत्र उपलब्ध करू शकतात. तसेच रेझरपे ने आता लवकरच मोठ्या व्यावसायिक कंपन्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहे. रेझरपेच्या विविध सुविधामुळे कंपनीच्या पेरोल व्यवस्थापनाचा खर्च जवळपास 60 टक्क्यांनी कमी होऊ शकतो असा दावा रेझरपेने केला आहे.