भारतातील पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'रामायण' (Ramayana) ही मालिका 1987 साली प्रसारित करण्यात आली. रामानंद सागर (Ramanand Sagar) यांनी या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेत अरुण गोविल (Arun Govil), सीतेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia), लक्ष्मणाच्या भूमिकेत सुनील लहरी (Sunil Lahiri), तर हनुमानाच्या भूमिकेत दारा सिंग (Dara Singh) यांना पाहायला मिळाले होते. त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात या मालिकेचे केवळ 50 भाग प्रसारित करण्यात येणार होते. मात्र लोकांचे प्रचंड प्रेम पाहून निर्मात्यांनी 50 भागांवरून ही मालिका 78 भागांपर्यंत प्रसारित केली. आजही या मालिकेतील गीत, संवाद आणि पात्र लोकांच्या लक्षात आहेत. आदिपुरुष चित्रपटाच्या निमित्ताने 'रामायण' ही मालिका पुन्हा चर्चेत आली. बॉलिवूड लाईफ (Bollywood Life) वेबसाईटने रामायण मालिकेतील कलाकारांच्या मानधनाबाबत माहिती दिली आहे. कलाकारांना देण्यात आलेले मानधन हे संपूर्ण मालिकेसाठी देण्यात आले आहे. या मालिकेतील कोणत्या कलाकाराला सर्वात जास्त मानधन मिळाले होते, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
रामायण मालिकेसाठी कलाकारांना मिळाले होते 'इतके' मानधन
अरुण गोविल (Arun Govil)
रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय इतका खराखुरा होता की, लोक त्यांना नमस्कार करत होते. या भूमिकेसाठी त्यांना 40 लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते. 40 लाख रुपये मानधन घेणारे अरुण गोविल रामायण मालिकेतील सर्वात महागडे कलाकार होते.
दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia)
माता सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी काम केलेले पाहायला मिळाले होते.या भूमिकेसाठी त्यांना 20 लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते. दीपिका चिखलिया या रामायण मालिकेतील मुख्य महिला अभिनेत्रींपैकी एक असून त्यांच्या अभिनयाने अनेकांना रडू कोसळले होते. त्यांच्यावर चित्रित झालेल्या अनेक सीनमधील अभिनयामुळे लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.
सुनील लहरी (Sunil Lahiri)
श्रीरामाचा छोटा भाऊ आणि राजा दशरथाचा पुत्र लक्ष्मणाच्या भूमिकेत सुनील लहरी यांनी काम केले आहे. या भूमिकेसाठी त्यांना जवळपास 15 ते 18 लाखांचे मानधन देण्यात आले होते.
दारा सिंग (Dara Singh)
रामायण मालिकेत हनुमानाची भूमिका दारा सिंग यांनी साकारली होती. त्या काळात दारा सिंग यांनी अनेक भूमिका यशस्वीपणे साकारल्या होत्या. मात्र त्यांची हनुमानाची भूमिका प्रचंड गाजली होती. आजही त्यांनी केलेले काम लोकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी त्यांना 35 लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi)
रामायणातील आणखी एक नामांकित पात्र म्हणजे रावण. सोन्याची लंका, पुष्पक विमान, दशमुखी चेहरा अशा अनेक गोष्टींनी साकारलेला रावण आपण सर्वांनीच रामायण मालिकेत पाहिला आहे. ही भूमिका अरविंद त्रिवेदी यांनी साकारली होती. ज्यासाठी त्यांना 30 लाख रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
रामायण मालिकेचे बजेट आणि कमाई जाणून घ्या
रामायण ही मालिका त्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. विशेष म्हणजे ही सर्वात महागडी मालिका म्हणून ओळखली जात होती. या मालिकेचा एक एपिसोड बनविण्यापासून तो प्रसारित करण्याचा खर्च 9 लाख रुपये इतका होता. तर एका एपिसोडमधून मालिका निर्मात्यांना जवळपास 40 लाख रुपये मिळत होते. या हिशोबाने लक्षात घेतले तर, या मालिकेने 78 भागातून जवळपास 3,000 लाखाहून अधिकची कमाई केली होती.
Source: bollywoodlife.com