Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ramayan Serial Budget: 36 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेली 'रामायण' मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता? जाणून घ्या

Ramayan Serial Budget

Image Source : www.egfiltros.com.br

Ramayan Serial Budget: नुकताच रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला असून तो अनेक विवादांमध्ये अडकला आहे.या चित्रपटाची तुलना लोक 36 वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या 'रामायण' (Ramayan) मालिकेशी करत आहे. या चर्चेच्या निमित्ताने रामायण मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता आणि एका एपिसोडमधून निर्मात्यांनी किती कमाई केली, जाणून घेऊयात.

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास आठवडा झाला आहे. हा चित्रपट भारतातील पौराणिक महाकाव्य रामायणावर (Ramayan) आधारित असून यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील डायलॉग,  पात्रांची निवड, कथानक आणि VFX ला घेऊन प्रचंड विरोध होताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या याच नाराजीचा परिणाम दुसऱ्याच दिवशीपासून बॉक्स ऑफिसवर चित्रपट निर्मात्यांना पाहायला मिळाला. स्पेशल डिस्काउंट ऑफर देऊन देखील प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले नाहीत. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होताना पाहायला मिळत आहे.

36 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेल्या 'रामायण' मालिकेशी प्रेक्षक अजूनही जोडले गेले आहेत. त्यामुळेच आदिपुरुष चित्रपटाची तुलना रामायण मालिकेशी केली जात आहे. लोकांच्या याच चर्चेतून पुन्हा एकदा रामायण मालिका चर्चेत आली आहे. या निमित्ताने रामायण मालिका बनविण्यासाठी किती खर्च आला होता? तसेच एका एपिसोडची कमाई किती होती? जाणून घेऊयात.

रामायण मालिकेचे बजेट आणि कमाई जाणून घ्या

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका रामायण आपल्या सर्वांच्याच आजही लक्षात आहे. 36 वर्षांपूर्वी प्रसारित झालेली ही मालिका 1987 साली लोकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या निर्मात्यांनी सुरुवातीला तिचे 52 भाग प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र लोकांचे अमाप प्रेम पाहून 52 भागांवरून या मालिकेचे 78 भाग प्रदर्शित करण्यात आले.  

या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेत अरुण गोविल (Arun Govil), सीतेच्या भूमिकेत दीपिका चिखलिया (Deepika Chikhalia), लक्ष्मणाच्या भूमिकेत सुनील लहरी (Sunil Lahiri), तर हनुमानाच्या भूमिकेत दारा सिंग (Dara Singh) यांना पाहायला मिळाले होते. ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली होती. त्या काळातील ही सर्वात महागडी मालिका होती. या मालिकेचा एक एपिसोड बनविण्यापासून ते प्रसारित करण्याचा खर्च 9 लाख रुपये होता. तर एका एपिसोडमधून मालिका निर्मात्यांना जवळपास 40 लाख रुपये मिळत होते. या हिशोबाने लक्षात घेतले तर, या मालिकेने 78 भागातून जवळपास 3,000 लाखा रुपयांहून अधिकची कमाई केली होती.

आदिपुरुष चित्रपटाचे बजेट जाणून घ्या

2023 मधील सर्वात मोठे बजेट असणारा चित्रपट म्हणजे 'आदिपुरूष'. 500 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट 16 जून रोजी शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यासाठी अजय अतुल (Ajay-Atul) यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे हिंदी आणि तेलगू भाषेत हा चित्रपट एकाच वेळी शूट करण्यात आला आहे.

आदिपुरुषची स्पेशल डिस्काउंट ऑफर काय होती?

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा 500 कोटींचे बजेट असणारा चित्रपट आहे. आतापर्यंत चित्रपटाने 250 कोटीहून अधिकची कमाई केली आहे. मात्र बजेटच्या तुलनेत चित्रपटाची कमाई फारच कमी झाल्याचे दिसून आले आहे. आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसला उतरती कळा लागली होती. हे जाणून घेऊन चित्रपट निर्मात्यांनी 22 आणि 23 जून रोजी विशेष ऑफर काढली होती. ज्या अंतर्गत तिकिटांच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या. थ्रीडी तिकिटाची किंमत 150 रुपये ठेवण्यात आली होती. मात्र एवढा मोठा डिस्काउंट देऊन देखील त्याचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही.

Source: abplive.com