मे महिना संपून आता जून महिना सुरू झाला आहे. त्यामुळे आता कधीही पाऊस पडायला सुरुवात होऊ शकते. पावसाळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्री (Umbrella). छत्रीशिवाय कोणतीही व्यक्ती पावसाळ्यात बाहेत पडू शकत नाही. आपल्यापैकी अनेकजण दरवर्षी पावसाळ्यात छत्र्यांची खरेदी करतात. रंगीबेरंगी, वेगवेगळ्या आकाराच्या छत्र्या दरवर्षी आपल्याला बाजारपेठेत विक्रीसाठी पाहायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्याच्या सीजनमध्ये छत्रीचा व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. चला तर, त्यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक किती करावी लागेल?
छत्री, रेनकोट, वॉटर बॉटल, वॉटरप्रूफ स्कूल बॅग कव्हर, रबरी शूज इ. गोष्टींची पावसाळ्याच्या सीजनमध्ये आवश्यकता असते. ही सर्व उत्पादने सिजनल वर्गात मोडतात. केवळ 5000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही हा व्यवसाय उभा करू शकता. छत्री आणि रेनकोटचे मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीमधून थेट मालाची खरेदी करून तुम्ही स्वतः किंवा इतर दुकानदारांना माल विक्री करून बक्कळ नफा कमवू शकता.
व्यवसायात नफा किती?
होलसेल दरात तुम्ही छत्र्या खरेदी केल्यानंतर थेट विक्रीमध्ये 30 ते 40% नफा कमवता येतो. तर दुकानदारांना छत्र्या विकून रिटेलमध्ये 25 ते 30% नफा सहज कमवता येतो.छत्र्यांची खरेदी ही तिच्या आकारावर, रंगावर आणि डिझाईनवर केली जाते. त्यानुसार छत्र्यांच्या किंमती निर्धारित केल्या जातात. लहान मुलांसाठी, तरुणांसाठी आणि वयोवृद्धांसाठी वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या छत्र्या बाजारात पाहायला मिळतात.
प्रत्येक पावसाळयात वेगवेगळ्या ट्रेंडच्या छत्र्या पाहायला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे छत्र्यांची विक्री झाली नाही, तरी त्या नीट सांभाळून ठेऊन पुढच्या सीजनमध्ये पुन्हा विक्रीसाठी काढल्या जाऊ शकतात. त्यामुळे दुकानदारांचे किंवा स्वतःचे नुकसान होण्यापासून वाचते. होलसेल दरात तुम्ही एकाच प्रकारातील एक डजन छत्र्या खरेदी करू शकता. त्या तुम्हाला अधिक स्वस्त मिळतील. सध्या कमीत कमी 200 रुपयांत दुकानदाराकडे छत्री खरेदी करता येते. हीच छत्री मोठ्या संख्येने खरेदी केल्यावर एक छत्री 80 ते 130 रुपयांमध्ये उपलब्ध होते.
माल कुठून खरेदी करता येईल?
तुम्ही राहत असलेल्या कोणत्याही शहरातील होलसेल मार्केटमधून छत्र्या आणि रेनकोटची खरेदी करू शकता. मुंबईतील क्रॉफीड मार्केटमध्ये केवळ पाच हजारात तुम्ही होलसेल दराने छत्र्या खरेदी करू शकता. महत्वाचं म्हणजे या छत्र्यांची खरेदी केल्यावर तुम्ही त्या टू व्हीलर वरून देखील घेवून जाऊ शकता. मात्र हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा छत्र्यांची संख्या मर्यादित असेल.
नेटवर्क वाढवा आणि व्यवसाय करा
छत्रीचा व्यवसाय तुम्ही ऑनलाईन माध्यमातून करू शकता. तुमच्या ऑनलाईन सोशल प्लॅटफॉर्मवर चांगला टार्गेट ग्रुप असेल, तर त्यावर छत्रीच्या व्यवसायाची जाहिरात करून चांगला सेल करू शकता. किंवा लोकल मार्केटमध्ये दुकांदारांशी नेटवर्क वाढवून छत्र्या सेल करू शकता. मात्र त्यासाठी नेटवर्क वाढवणे गरजेचे आहे.
क्रेडिट सिस्टीमचा वापर करा
तुम्ही बाजारपेठेत नवखे असल्याने कदाचित तुमच्याकडून दुकानदार माल खरेदी करताना थोडा विचार करू शकतील. अशा वेळी तुमच्यातील आणि दुकानदारामधील नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि तुमचे संबंध घट्ट करण्यासाठी तुम्ही क्रेडिट इन ऍडव्हान्स (Credit in Advance) या पर्यायचा वापर करू शकता. यामध्ये दुकानदाराला माल देऊन त्याची अर्धी किंमत सुरुवातीला घेणे आणि उर्वरित अर्धी किंमत 60 किंवा 90 दिवसांच्या कालावधीनंतर घेणे. यामुळे दुकानदाराकडे त्यावेळी जरी पैसे जरी नसतील, तरी क्रेडिट इन ऍडव्हान्स पर्यायांमुळे माल खरेदी करता येईल. यामध्ये केवळ एकच धोका आहे, तो म्हणजे क्रेडिट कालावधीनंतर पैसे वसूल करणे. त्यामुळे किती टक्के ऍडव्हान्स रक्कम घ्यायची आणि त्यासाठी किती वेळ द्यायचा हे तुम्हालाच ठरवावे लागेल.
सीजनमध्ये कोणत्या वस्तूंची विक्री करता येईल?
पावसाळ्यात सर्वांकडे छत्री ही असतेच. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या छत्र्यांची विक्री करता येऊ शकते. याशिवाय रेनकोट,वॉटर बॉटल, वॉटरप्रूफ स्कुल बॅग कव्हर, रबर शूज इ. गोष्टींची विक्री करता येऊ शकते.
Source: hindi.moneycontrol.com