Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gati Shakti Express: पोस्ट आणि रेल्वेकडून 'गती शक्ती एक्सप्रेस' सुरू; पार्सलची मिळणार 'होम डिलिवरी'

Rail Post Gati Shakti Express

देशभरात मालाची ने-आण आणि पार्सल सुविधा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि इंडियन पोस्ट एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून 'गती शक्ती एक्सप्रेस' सुरू केली आहे. पार्सलची डोअर स्टेप डिलिवरी आणि पिकअप सुविधा या द्वारे ग्राहकांना मिळणार आहे.

   Gati Shakti Express: देशभरात मालाची ने-आण आणि पार्सल सुविधा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि इंडियन पोस्ट एकत्र आले आहेत. दोघांनी मिळून 'गती शक्ती एक्सप्रेस' सुरू केली आहे. पार्सलची डोअर स्टेप डिलिव्हरी आणि पिकअप सुविधा या द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. रेल्वेद्वारे होणारी मालाची वाहतूक इतर पर्यायांपेक्षा तुलनेने स्वस्त असते. त्यामुळे या जलद सेवेचा लाभ कंपन्यांसह ग्राहकांनाही घेता येणार आहे.

गती शक्ती एक्सप्रेस कार्गो (Joint Parcel Product -JPP)

दक्षिण रेल्वे विभागात ही स्पेशल कार्गो ट्रेन सुरू करण्यात आली आहे. Joint Parcel Product (JPP) सेवेंतर्गत गती शक्ती एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. हैदराबादमधील काचिगुडा रेल्वे स्टेशनवरुन ही स्पेशल ट्रेन सुटेल तर शेवटचा स्टॉप दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन असेल. तेथून पोस्ट विभागाद्वारे मालाची वाहतूक केली जाईल. उत्तर रेल्वे विभागानेही याच धरतीवर एक स्पेशल कार्गो ट्रेन सुरू केली आहे.

डोअर टु डोअर सुविधा मिळणार (Door to Door facility by Gati Shakti Express)

गती शक्ती एक्सप्रेस द्वारे ग्राहकांना डोअर टु डोअर पार्सल सुविधा मिळणार आहे. पार्सल सुविधेच्या विस्तारासाठी इंडियन रेल्वे आणि पोस्टाने ही योजना सुरू केली आहे. मागील वर्षी बजेटमध्ये या सुविधेची घोषणा करण्यात आली होती. ग्राहकाच्या घरुन किंवा इच्छित स्थळावरुन पार्सल पिक अप करण्यात येईल. (Gati Shakti Express Cargo Service) तसेच डोअर टु डोअर डिलिवरी केली जाईल. पार्सल सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे आणि पोस्टाने विशेष बॉक्स आणि अत्याधुनिक मशिनरही उपलब्ध केले आहेत. ज्यामुळे सामानाची वाहतूक लोडिंग-अन लोडिंग जलद होईल.

सामान पॅकिंगसाठी खास बॉक्स

पार्सल आणि सामानाचा विमा काढण्याची सुविधाही देण्यात आली आहे. माल खराब झाल्यास किंवा गहाळ झाल्यास विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सामानाची पॅकिंग करण्यासाठी जाळीचे, फोल्डेबल, बबल बॉक्सेस तयार करण्यात आले आहेत. लाइटवेट अल्युमिनिअमच्या बॉक्समधूनही सामानाची ने-आण केली जाणार आहे.