टेक कंपनी झोहोचे सीईओ आणि सह-संस्थापक श्रीधर वेंबू यांची बहीण राधा वेंबू यांनी गेल्या वर्षभरात M3M Hurun Global Rich List या जागतिक श्रीमंतांच्या यादीत 103 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर विश्वातील दुसऱ्या श्रीमंत महिला म्हणून राधा यांनी ओळख निर्माण केली आहे. या यादीत एकूण 247 सेल्फ मेड महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 81% महिला या चीनमधील आहेत.
कोण आहेत राधा वेंबू?
झोहो ही एक भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे 1996 साली राधा आणि श्रीधर वेंबू या भावडांनी मिळून कंपनीची स्थापना केली. राधा यांच्याकडे कंपनीचे मोठे स्टेक होल्डिंग आहे. झोहो कंपनीने 2700 कोटींपेक्षा अधिक नफा कामावला आहे. ही एक बूटस्ट्रॅप्ड स्वरूपाची कंपनी असूनही त्यांनी हे यश मिळवले आहे. झोहोमध्ये 80% हिस्सेदारी श्रीधर आणि राधा वेंबू या बहिण भावांची आहे.
शिक्षण आणि वैयक्तिक जीवन
राधा वेंबू यांचा जन्म 24 डिसेंबर 1972 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चेन्नईतील हायर सेकेंडरी स्कूलमधून झाले. पुढे औद्योगिक व्यवस्थापन या विषयात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर मद्रास उच्चन्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून त्यांची 1997 साली नियूक्ती करण्यात आली.
राधा वेंबू यांची व्यावसायिक कारकीर्द
1996 साली राधा वेंबू यांनी उच्च शिक्षण घेत असतानाच भाऊ श्रीधर यांच्यासोबत मिळून कंपनीची स्थापना केली त्यावेळी श्रीधर हे पीएचडीचे शिक्षण घेत होते. या भावडांनी उभारलेल्या कंपनीचे नाव सुरुवातीला AdvenNet असे होते परंतु नंतर त्याचे नाव झोहो कॉर्पोरेशन हे करण्यात आले. राधा यांचा दुसरा भाऊ देखील कंपनीत स्टेक होल्डर आहे. पण तुलनेने ते कमी सक्रिय आहेत. अमेरिकेतील टेक्सास येथे झोहोचे 375 एकरात कंपनीचे भव्य मुख्यालय आहे. राधा वेंबू या जानकी हाय-टेक अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड, एक कृषी एनजीओ आणि हायलँड व्हॅली कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीच्या संचालिका देखील आहेत.
राधा वेंबू यांची एकूण संपत्ती (Net Worth Of Radha Vembu)
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या Huron Global Rich List नुसार राधा वेंबू यांच्याकडे 32,800 कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. झोहोमधील स्टेकमुळे शेकडो कोटींनी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. अहवालानुसार राधा यांच्या संपत्तीत रोज 8 कोटी रुपयांची वाढ होत आहे.
(News Source : Financial Express )