• 27 Mar, 2023 06:25

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Quiet Hiring : 2022 मध्ये अनेक ठिकाणी सुरू झाला क्वाईट हायरिंगचा ट्रेंड

Quite Hiring

कॉर्पोरेट जगतात नोकरकपातीदरम्यान अनेक ट्रेंड पहायला मिळत आहेत. मागील काही वर्षापासून त्यात आणखी एक नवा ट्रेंड समोर येत आहे. ज्याला 'क्वाईट हायरिंग' (Quiet Hiring) ट्रेंड म्हटले जात आहे.

सध्या आपण दररोज नोकरकपातीच्या बातम्या वाचत असतो. कॉर्पोरेट जगतात नोकरकपातीदरम्यान अनेक ट्रेंड पहायला मिळत आहेत. यामध्ये 'मोठ्या संख्येने राजीनामा देणे', 'शांतपणे नोकरी सोडणे', 'एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करणे' आणि 'कंपन्यांच्या धोरणावर नाराज होऊन इतर कंपन्यांमध्ये अर्ज करणे' यासारखे ट्रेड समाविष्ट आहेत. मागील काही वर्षापासून त्यात आणखी एक नवा ट्रेंड समोर येत आहे. ज्याला 'क्वाईट हायरिंग' (Quiet Hiring) ट्रेंड म्हटले जात आहे. या ट्रेंडनुसार कंपन्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांनाच रिक्त पदांवर बढती देत आहेत. 

कर्मचाऱ्यांना नवनवीन कौशल्ये शिकवण्यास प्राधान्य 

तांत्रिक सल्लागार आणि संशोधन कंपनी गार्टनर या ट्रेंडबद्दल सांगतात. गार्टनरचे म्हणणे आहे की 2022 मध्ये कंपन्यांनी कोणाला कामावर न घेता नवीन टॅलेंट शोधण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला. या अंतर्गत कंपन्या नवीन भरती करण्याऐवजी रिक्त जागांवर कंपनीतील कर्मचाऱ्यांना बढती देत आहेत. यासाठी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नवनवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देत आहेत. त्याच वेळी, विशिष्ट काम करण्यासाठी तात्पुरते कर्मचारी नियुक्त करण्यावर भर दिला जात आहे. या ट्रेंडच्या मदतीने, कंपन्यांना मंदीच्या काळात त्यांचे उत्पादन कमी करावे लागत नाही. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची गरज पडत नाही. 

कंपन्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांना फायदा 

उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीत डेटा सायंटिस्टची भरती रिक्त असेल, तर कंपनी आधीच अस्तित्वात असलेल्या कर्मचार्‍यांमधून योग्य प्रतिभा ओळखत आहे, त्यांना कौशल्ये शिकवते आणि त्यांना डेटा सायंटिस्ट म्हणून काम करायला लावते. इतर कामांसाठी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येते. या क्वाईट हायरिंग ट्रेंडचा फायदा केवळ कंपन्यांना होत नाही, तर नवीन विभागांमध्ये नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही फायदा होत आहे. 

अनेक टेक कंपन्यांनीही हा ट्रेंड फॉलो केला 

खरं तर, नवीन ठिकाणी पोस्टिंग मिळाल्यावर कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात वाढ होते त्यासोबतच कंपनीचे त्यावर अवलंबित्वही वाढते. तसेच, नवीन नोकरी शोधल्यासही, कर्मचार्‍यांना फायदा होतो. गार्टनरच्या मते, 2022 मध्ये गुगलमध्ये मोठ्या प्रमाणात क्वाईट हायरिंग झाली. इतर अनेक टेक कंपन्यांनीही हा क्वाईट हायरिंगचा ट्रेंड फॉलो केला आहे. 

कंपन्या क्वाईट हायरिंग का करतात? 

कर्मचारी कपातीच्या काळात काही कंपन्यांकडून क्वाईट हायरिंगचा पर्याय निवडण्यात येत आहे. याद्वारे कंपन्यांचा पैसा वाचण्यासोबतच, कर्मचारी बर्नआउट टाळणे, सर्वोत्तम कर्मचारी ओळखणे, उत्तम धोरणात्म नियोजन यासारख्या कारणांसाठी कंपन्या क्वाईट हायरिंगचा पर्याय निवडत आहेत.  

News Source - Quiet Hiring:छंटनी के बीच चुपचाप भर्तियां कर रहीं कंपनियां, 2022 में कई जगह शुरू हुआ ट्रेंड - Quiet Hiring Is New Trend In Work Place Amid Lay Offs Moonlighting Great Resignation - Amar Ujala Hindi News Live  

Quiet Hiring: Everything You Need to Know From a Staffing Expert (mondo.com)