प्रुडंट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (Prudent Corporate Advisory Services) कंपनीचा 10 मे रोजी ओपन झाला असून तो 12 मे पर्यंत खुला असणार आहे. प्रुडंट कंपनी आयपीओद्वारे 538.6 कोटी रुपये उभारणार आहे. प्रुडंट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (Prudent Corporate Advisory Services) हा भारतातील एक स्वतंत्र वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिस समूह आहे. कंपनीची स्थापना 2003 मध्ये झाली असून, कंपनी म्युच्युअल फंड्स, जीवन आणि सामान्य विमा (Life and General Insurance), शेअर्स, ब्रोकिंग सेवा, मालमत्ता वाटप आणि ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. प्रुडंट कंपनी फंड्जबाजार, प्रुडंटकनेक्ट, पॉलिसीवर्ल्ड, वाईसबास्केट आणि क्रेडिटबास्केट सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल वेल्थ मॅनेजमेंटची सेवा देते.
? Prudent Corporate IPO
?Dates : 10 - 12 May 2022
?Price Band : ₹595 - ₹630
?Lot Size : 23 Shares
?Retail Quota : 35% (1,29,870 Applications)
?GMP : ₹30 - ₹35 Per Share (Low Volume)#sharemarketipo #prudentipo #IPOAlert #IPOs pic.twitter.com/BOOVMR4nwL— Stocktrader___ (@stocktrader__) May 10, 2022
शेअर्सची किंमत काय असेल?
कंपनीने आयपीओसाठी 595-630 रुपये ही रेंज निश्चित केली असून कंपनी या आयपीओ (IPO) द्वारे 538.6 कोटी रुपये उभारणार आहे. तसेच कंपनीचे सर्व 85,49,340 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. म्हणजेच, या आयपीओ अंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदार हे त्यांचे सर्व शेअर्स विकणार आहेत. यामध्ये कोणतेही नवीन शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार नाहीत. वॅगनर लिमिटेड कंपनी प्रुडंटमधील 82,82,340 शेअर्सची विक्री करत आहे; तर कंपनीचे CEO शिरीष पटेल 2,68,000 शेअर्स विकणार आहेत. आयपीओमधून उभारण्यात येणारी रक्कम कंपनीला दिली जाणार नसून ती कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांना मिळणार आहे.
लॉट साईज काय असेल?
प्रुडंटच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये 23 शेअर्स असतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना यासाठी किमान 14,490 रुपये गुंतवावे लागतील. किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करू शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. तर एकूण इश्यूमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आणि 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत.
ग्रे मार्केटची स्थिती
प्रुडंटचा स्टॉक सोमवारी (9 मे रोजी) ग्रे मार्केटमध्ये (gray market) 30 रूपयांच्या प्रीमियमवर ट्रेंड करत होता. म्हणजेच, ग्रे मार्केटला प्रुडंटची मार्केटमधील लिस्टिंग 660 रुपये अपेक्षित आहे. कंपनीने आयपीओ (IPO) ओपन करण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 159.43 कोटी रुपये उभे केले आहेत. स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने, 24 अँकर गुंतवणूकदारांना 630 रुपयांच्या किमतीत 25,30,651 इक्विटी शेअर्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीतील गुंतवणूकदार
कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये सोसाईट जनरेल (Societe Generale), कुबेर इंडिया फंड) Kuber India Fund, डीएसपी म्युच्युअल फंड (DSP Mutual Fund), एचडीएफसी म्युच्युअल फंड (HDFC MF), अॅक्सिस म्युच्युअल फंड (Axis MF), एल अॅण्ड टी म्युच्युअल फंड (L&T MF), युटीआय म्युच्युअल फंड (UTI MF), कॅनरा रोबेको (Canara Robeco MF), मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal MF), आदित्य बिर्ला सन लाइफ (Aditya Birla Sun Life MF), कोटक (Kotak MF) आणि एचएसबीसी (HSBC MF) यांचा समावेश आहे.