व्यवसाय सुरू करण्यासाठी एक कल्पना पुरेशी ठरते. तसेच तुम्ही मार्केटमधील गरज ओळखून व्यवसायाची सुरुवात केल्यास त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील होऊ शकता. सध्या अनेकजण आपल्या घरी जातीवंत आणि दिसायला आकर्षक असा कुत्रा पाळत आहेत. तसेच अशा प्रकारे पाळीव प्राणी पाळणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. नागरिकांची हीच वाढती संख्या विचारात घेऊन पाळीव कुत्र्यांची विक्री करणाच्या एक व्यवसाय पुण्यात उभा राहिला आहे. प्रीमियम पेट हाऊस (Premium pet house) असे त्या कंपनीचे नाव आहे.
प्रीमियम पेट हाऊस
कुत्रा हा अनेकांच्या घरातील सदस्य झाला आहे. तसेच सध्या देशी विदेशी जातीच्या कुत्र्यांना पाळण्याचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी नागरिक मोठी किंमतही मोजायला तयार असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या पाळीव प्राण्याची विक्री, प्रजनन केंद्रे, उपचार, खाद्य विक्रेते याच्या व्यवसायातही मोठी वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांना खात्रीशीर, चागल्या गुणवत्तेची देशी विदेशी जातीचे कुत्र्याचे पिल्लू उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यामध्ये शिवलिंग गिरी यांनी प्रीमियम पेट हाऊसची सुरुवात केली आहे. या कंपनीकडून ग्राहकांच्या मागणीनुसार चांगल्या प्रजातीची कुत्री उपलब्ध करून दिली जातात. प्रीमियम पेट हाऊस ही कंपनी कुत्र्यांचे प्रजनन केंद्र म्हणून नावारुपाला आलेली कंपनी आहे. कंपनीचे पुण्यासह मुंबई आणि कोल्हापूरमध्ये देखील व्यवसाय केंद्रे आहेत.
500 पिल्लांची विक्री-
प्रीमियम पेट हाऊस या कंपनीकडे देशी विदेशी जातीची कुत्र्यांचे ब्रिड उपलब्ध आहेत. कंपनीने पाळीव प्राण्याच्या विक्री व्यवसायसंदर्भात ग्राहकांमध्ये एक विश्वासहर्ता निर्माण केली आहे. त्यामुळे कुत्र्याचे पिल्लू खरेदी करणाऱ्यांकडून प्रीमियम पेट हाऊस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीने ऑगस्ट महिन्यात तब्बल 500 कुत्र्यांची पिल्ले विक्री केली आहेत.
10 हजारापासून 2 लाखांपर्यंत पिलांच्या किमती
श्वानप्रेमींची नागरिकांची कुत्र्याच्या जातीसंदर्भात वेगवेगळ्या आवडी निवडी असतात. अत्यंत खेळकर, दिसायला आकर्षक अशा कुत्र्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. तर काही नागरिकांकडून केवळ सुरक्षेच्या कारणास्तव कुत्रा पाळण्यास पंसती दिली जाते. यामध्ये लॅब्राडोर (Labrador), गोल्डन रिट्रीव्हर (Golden Retriever), बॉक्सर (Boxer), डॉबरमन (Doberman), सायबेरियन हस्की (Siberian Husky), जर्मन शेफर्ड (German Shepherd),माल्टीज (Maltese), इंग्रजी बुलडॉग (English Bulldog), टॉय पोमेरेनियन (Toy Pomeranian) देशी विदेशी जातीच्या कुत्र्यांचा समावेश असतो. प्रीमियम पेट हाऊसकडे अशा विविध गुणवैशिष्ट्यांची आणि जातीची कुत्री विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीकडे 10,000 रुपयांपासून ते 2 लाखांपर्यंतच्या किमतीची कुत्र्यांची पिल्ले उपलब्ध असून कंपनीच्या व्यवसायाची वार्षिक उलाढालही 25 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे शिवलिंग गिरी यांनी सांगितले.