तुमच्याजवळ काही पैसा शिल्लक असल्यास, त्याचे डबल करण्यासाठी पोस्टाच्या एफडीमध्ये म्हणजेच पोस्ट ऑफिस टाईम डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करु शकता. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास 10 वर्षात तुमचा पैसा दुपटीहून अधिक वाढणार आहे. सध्या पोस्टाच्या 5 वर्षाच्या एफडीवर 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, पोस्टाच्या टाईम डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. तुमचा पैसा सुरक्षित राहिल आणि तुम्हाला चांगला रिटर्नही मिळेल.
एफडी उघडण्यासाठी तुमचे पोस्टात खाते असणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. सध्या पोस्टात अल्प मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकणार आहात. यामध्ये तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षासाठी गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तुम्ही याआधी अन्य ठिकाणी एफडी केली असल्यास, तुम्हाला काही वेगळे ट्राय करायचे असेल तर तुम्ही या वेळी पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करु शकता.
कसे होतील पैसे दुप्पट?
सध्या पोस्ट ऑफिसच्या एफडीवर 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपाॅझिट योजनेत 5 लाख पाच वर्षासाठी 7.5 टक्के व्याजदरावर डिपाॅझिट केले. त्यावर तुम्हाला 5 वर्षात 2,24,974 रुपये व्याज मिळेल. हे फक्त पाच वर्षाचं झालं. म्हणजेच 5 वर्षात तुमच्याजवळ 7,24,974 रुपये जमा होतील.
हीच रक्कम तुम्ही पुन्हा पाच वर्षासाठी या योजनेत डिपाॅझिट केल्यास, ती रक्कम काढतेवेळी 10,51,175 रुपये होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला दुपटीहून जास्त पैसा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन करुन पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुमचा खूप फायदा होणार आहे.
टाईम डिपाॅझिटचे व्याजदर
तुम्ही टाईम डिपाॅझिटचे व्याजदर पाहिल्यास, चक्राऊन जाल. कारण, सगळ्याच मुदतीवर त्यांनी खूप चांगले व्याजदर दिले आहे. यामध्ये तुम्ही जर 1 वर्षासाठी रक्कम डिपाॅझिट करत असल्यास, त्यावर तुम्हाला 6.9 टक्के व्याजदर मिळेल. तेच तुम्ही 2 वर्षासाठी रक्कम टाकायची ठरवल्यास, त्यावर तुम्हाला पोस्ट 7 टक्के व्याजदर देत आहे.
तर 3 वर्षासाठीही तुम्हाला 7 टक्के व्याजदर मिळेल. तुम्ही जर पाच वर्षासाठी एफडी करत असल्यास, तुम्हाला त्यावर 7.5 टक्के व्याजदर पोस्ट देते. त्यामुळे तुम्ही जर अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, तेही तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते.
पोस्ट ऑफिस सरकारी असल्यामुळे तुमचा पैसा सुरक्षित राहतो. तसेच, पोस्टाची टाईम डिपाॅझिट योजना चांगला व्याजदर देत आहे. त्यामुळ तुम्ही प्लॅनिंग करुन गुंतवणूक केल्यास, दुपटीहून अधिक पैसे मिळवू शकणार आहात.