सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा हवा असेल, तर बहुसंख्य लोकांची पोस्टातील योजनांना पसंती पाहायला मिळत आहे. पोस्टामार्फत अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. नुकताच केंद्र सरकारने पोस्टातील आवर्ती ठेव योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. पूर्वी या योजनेत 6.2 टक्के व्याजदर मिळत होता. केंद्र सरकारने 0.30 टक्के व्याजदरात वाढ केल्यानंतर या योजनेत सध्या 6.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
आवर्ती ठेव (Recurring Deposit Scheme) योजनेत गुंतवणूकदार निश्चित कालावधीसाठी मासिक आधारावर गुंतवणूक करू शकतो. यामधील आकर्षक व्याजदारामुळे मॅच्युरिटीवेळी चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. या योजनेत मासिक 2000 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 1.5 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळवता येऊ शकतो. तो कसा, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
गुंतवणूक कालावधी जाणून घ्या
पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) 1, 2, 3 वर्ष आणि 5 वर्षासाठी पैसे गुंतवता येतात. मात्र हे पैसे मासिक आधारावर गुंतवले जातात.
2000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 'इतका' परतावा
तुम्हीही पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) मासिक 2000 रुपयांची गुंतवणूक सुरु केली, तर वार्षिक तुम्ही 24,000 रुपये गुंतवू शकता. हीच गुंतवणूक 5 वर्षासाठी केली, तर 6.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने तुम्हाला 5 वर्षांनंतर 1 लाख 41 हजार 983 रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 1 लाख 20 हजार रुपये होणार आहे. तर 21,983 रुपये तुम्हाला परतावा स्वरूपात मिळणार आहेत.
2500 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 'इतका' परतावा
2000 रुपयांची गुंतवणूक वाढवून तुम्ही ती 2500 रुपये केली, तर 5 वर्षांनंतर तुम्हाला 6.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी एकूण 1 लाख 77 हजार 481 रुपये मिळणार आहेत. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 1 लाख 50 हजार इतकी असणार आहे. तर त्यावर निव्वळ व्याज 27,481 रुपये मिळणार आहे.
3000 च्या गुंतवणुकीवर मिळेल 'इतका' परतावा
तुम्ही महिन्याला 3000 रुपयांची आरडी (Recurring Deposit Scheme) केली, तर 5 वर्षासाठी तुम्हाला 6.5 टक्के व्याजदराच्या हिशोबाने मॅच्युरिटीवेळी 2 लाख 12 हजार 971 रुपये मिळणार आहेत. या पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1 लाख 80 हजार जमा होईल. तर त्यावर तुम्हाला 32,972 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
Source: hindi.moneycontrol.com