सरकारी योजनांमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. सरकारकडून अनेक शासकीय गुंतवणूक योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये गुंतवणूक करून सर्वोत्तम परतावा मिळवता येऊ शकतो. तुम्हाला देखील सरकारी योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या योजना हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. याच वेगवेगळ्या योजनांपैकी एक म्हणजे 'पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना' (Gram Suraksha Yojana).
ही पोस्टाची खूप जुनी योजना आहे. जर तुम्ही थोडी जोखीम घेऊन आर्थिक गुंतवणूक करू शकत असाल, तर ग्राम सुरक्षा योजना तुमच्या फायद्याची ठरू शकते. आजकाल अनेक लोक या योजनेकडे आकर्षक होत आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला या योजनेद्वारे मासिक 1500 रुपयांची गुंतवणूक केल्यावर 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. चला तर, या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट ऑफिस ग्राम सडक योजनेबद्दल माहिती जाणून घ्या
पोस्ट ऑफिसची ग्राम सडक योजना ही भारत सरकारकडून चालवण्यात येते. या योजनेची सुरुवात ही पोस्टातील ग्राहकांसाठी करण्यात आली आहे. हा एक असा जोखीमयुक्त प्लॅन आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
या योजनेत तुम्ही 1500 रुपये मासिक आधारावर गुंतवू शकता. दर महिन्याला ही रक्कम गुंतवल्यानंतर ठराविक कालावधीनंतर तुम्हाला 31 ते 35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.
या योजनेत 19 ते 55 वर्ष या दरम्यानचे लोक गुंतवणूक करू शकतात. केवळ भारतीय (Indian) लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
यामध्ये वार्षिक आधारावर कमीत कमी 10 हजार रुपये, तर जास्तीत जास्त 10 लाख रुपये गुंतवता येऊ शकतात. याचा प्रीमियम गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकतात.
विशेष म्हणजे यातील गुंतवणुकीवर कर्ज (Loan) घेण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. या योजनेत पैसे गुंतवले की, 3 वर्षानंतर तुम्ही या योजनेला सरेंडर देखील करू शकता.
35 लाखांपर्यंतचा लाभ कसा मिळेल?
19 वर्षाच्या व्यक्तीने या योजनेत 10 लाखांची पॉलिसी खरेदी केली असेल, तर 55 वर्षांसाठी गुंतवणूकदाराला 1515 रुपये मासिक हप्ता भरावा लागू शकतो. तर 58 वर्षाच्या कालावधीसाठी मासिक 1463 रुपये, 60 वर्षासाठी मासिक 1411 रुपये हप्ता भरावा लागणार आहे.
55 वर्षासाठी गुंतवणूकदाराला 31.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल. 58 वर्षासाठी या योजनेतून 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षासाठी 34.60 लाख रुपये, परिपक्व कालावधीनंतर परतावा मिळेल.
गुंतवणुकीवर चांगला परतावा
पोस्ट ऑफिस बचत योजना तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा देते. बरेच लोक शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात (Mutual funds)गुंतवणूक करतात, त्यामुळे अनेकांनी आता क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पण या सर्व गुंतवणुकीत भरपूर जोखीम असते. यामध्ये परतावा केव्हा आणि किती मिळेल, हे निश्चित नाही. कारण यातील परतावा बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. पण पोस्ट ऑफिसची ही छोटी बचत योजना तुम्हाला प्रचंड परतावा देते. तेही वयाच्या शेवटच्या टप्प्यावर, जेव्हा तुम्हाला किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्यांना त्याची खूप गरज असते. त्याचबरोबर त्यात तुमचे पैसे बुडण्याचा धोका नाही.
Source: hindi.moneycontrol.com