Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pomegranate Rate: डाळींबाला मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद; प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ

Pomegranate Rate

Pomegranate Rate: महाराष्ट्रात मृग बहरातील डाळिंबाची काढणी सुरू झाली असून आतापर्यंत 10 ते 15 टक्के डाळिंबाची विक्री सुद्धा झाली आहे.

Pomegranate Rate:  महाराष्ट्रात मृग बहरातील डाळिंबाची काढणी(Pomegranate Harvest) सुरू झाली असून आतापर्यंत 10 ते 15 टक्के डाळिंबाची विक्री(Pomegranate Sale) सुद्धा झाली आहे. सध्या चांगल्या क्वालिटीच्या डाळिंबाला 1 किलोसाठी 120 ते 150 रुपयांपर्यंत दर(Pomegranate Rate) मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलने यावर्षी डाळिंबाला प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत डाळींबाला यंदा चांगला भाव

देशात यावर्षी मृग बहारात डाळिंबाला(Pomegranate) सुमारे 40,000 हेक्टरवर बहर आला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच डाळिंबाला पोषक असे वातावरण(Environment) मिळाल्यामुळे डाळिंब बागा चांगल्या बहरल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी सांगत आहेत. ऑगस्ट महिन्यात डाळिंबाचे वजन 50 ग्रॅम ते 100 ग्रॅम झाले होते. त्याचवेळी ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर अतिपाऊस आणि सतत पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पाहायला मिळाला होता मात्र त्यावर शेतकऱ्यांना(Farmer) मात मिळवण्यात यश आले. हंगामाच्या सुरुवातीपासूनच डाळिंबाचे दर प्रति किलोस 100 ते 150 रुपये असे होते. आतापर्यंत देशात 10 ते 15 टक्के काढणी पूर्ण झाली असून बाजारपेठेत डाळिंबाची आवक कमी असल्याने मागणीही चांगली पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून डाळिंबाला 120 ते 150 रुपये असा दर मिळत असून डाळिंबाचे दर आजतागायत टिकून आहेत. मागील वर्षाच्या तुलने यावर्षी डाळिंबाला प्रति किलोमागे 10 ते 15 रुपयांची दरवाढ झाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

बागा वाचवण्यासाठी करावा लागला खर्च

सातत्याने बदलत असलेल्या वातावरणाचा फटका डाळिंबाच्या(Pomegranate) बागांना बसला आहे. सध्या डाळिंबाच्या उत्पादनात एकरी सुमारे 2 ते 3 टनाने घट झाली असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही डाळिंब बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या खर्चातही वाढ झाली आहे. डाळिंबाला दर चांगले मिळत असले तरीही, डाळिंब बागांचा खर्चही वाढला असल्याने शेतकऱ्यांसाठी आर्थिक गणित जुळणे मुश्कीलीचे झाले आहे.