• 07 Jun, 2023 23:57

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Poco F5 भारतात लाँच होणार; पॉवरफुल्ल प्रोसेसर आणि बरंच काही...किंमत जाणून घ्या

Poco F5

Image Source : www.gadgets360.com

Poco F5 आणि Poco F5 Pro हे मोबाइल आज भारतामध्ये लाँच होणार आहेत. तुम्ही जर नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर थोडा धीर धरा. कारण 11 मे पासून तुम्हाला इ-कॉमर्स साइटवर मोबाईल खरेदी करता येतील. दोन्ही मोबाइलमधे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत.

Poco F5 आणि Poco F5 Pro हे मोबाइल भारतामध्ये आज लाँच होत आहे. तुम्ही जर नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर थोडा धीर धरा. कारण 11 मे पासून तुम्हाला इ-कॉमर्स साइटवर मोबाइल खरेदी करता येतील. आज सायंकाळी साडेपाच वाजता फोनचे भारतात अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही Poco च्या युट्यूब चॅनलवरुन लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे पाहू शकता.

या फोन्सची खास बाब म्हणजे, आत्तापर्यंत कोणत्याही मोबाइलमधे नसलेला Snapdragon 7+ Gen 2 हा प्रोसेसर फोनला देण्यात आला आहे. हा प्रोसेसर युझरला गेमिंग आणि इतर कामे करताना तगडा परफॉर्मन्स देईल, असा दावा कंपनीने केला आहे. पोको ही चीनमधील आघाडीची स्मार्टफोन निर्मिती कंपनी असून भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून स्मार्टफोन विक्री करते.

किती असेल किंमत (Poco F5 Pro Price)          

कंपनीने या आधी Poco F4 हा फोन भारतात लाँच केला होता. त्याचेच हे पुढचे व्हर्जन Poco F5 आहे. तुमचे बजेट जर 30 हजारांच्या आत असेल तर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करू शकता. या फोनची किंमत 28 हजार ते 30 हजारांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. Poco F5 Pro या फोनची किंमत 30 हजारांच्या पुढे असू शकते. मात्र, निश्चित किंमत लाँचवेळीच कळू शकेल. मीड रेंजमधील हे फोन भारतातील मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत. 

कोठे खरेदी करू शकाल? (Poco F5 Pro where to buy)

Poco F5 हा फोन इ-कॉमर्स साइटवर खरेदीसाठी 11 मे पासून उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. फ्लिपकार्टवरून तुम्हाला हा फोन ऑर्डर करता येऊ शकतो. पोको कंपनीच्या युट्यूब चॅनेलवर सायंकाळी 5:30 PM फोन लाँचिंगचा लाइव्ह कार्यक्रम पाहता येईल.

Poco F5 Pro फिचर्स

Poco F5 Pro फोनला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 5,160mAh बॅटरी असेल.

कार्बन ब्लॅक आणि स्नो स्टॉर्म व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

64MP प्राइमरी कॅमेरा, 8 MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मायक्रो कॅमेरा असे तीन कॅमेरे असतील.

Poco F5 Pro आणि F5 मध्ये अँड्राइड 13 असेल.

6.67-inch AMOLED डिस्प्ले आणि Gorilla Glass 5

Poco F5 फिचर्स

Poco F5 फोनला Snapdragon 7+ Gen 2 प्रोसेसर आणि 5, 000mAh बॅटरी असेल.

6.67-inch AMOLED स्क्रिन

5,000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जरसह असेल.

64MP प्राइमरी कॅमेरा, 8 MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मायक्रो कॅमेरा असेल.

16MP फ्रँट कॅमेरा.

कार्बन ब्लॅक आणि स्नो स्टॉर्म व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.