प्रधानमंत्री मुद्रा योजनेला (PMMY) शुक्रवारी 7 वर्षे पूर्ण झाली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 34.42 कोटी लाभार्थ्यांना 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल, 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली होती. या योजनेला 7 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.
On 7th anniversary of #PMMY, Finance Minister Smt. @nsitharaman congratulated all the Mudra beneficiaries and urged other prospective borrowers to come forward and take part in the nation-building process#7YearsOfPMMY #FundingTheUnfunded pic.twitter.com/4HGqorK35N
— Ministry of Finance (@FinMinIndia) April 8, 2022
उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी या योजनेद्वारे कर्ज दिले जाते. ज्यामध्ये बिगर कंपनी आणि बिगरशेती लघु आणि सूक्ष्म घटकांना 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. 34.42 कोटींहून अधिक कर्ज खात्यांद्वारे 18.60 लाख कोटी रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. मुद्रा योजनेमुळे लहान व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले तर अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. या योजनेतून 68 टक्क्यांहून अधिक महिलांना तर 22 टक्के नवीन उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले.
काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना? लाभ कोण घेऊ शकतो?
मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज दिले जाते. ज्यांना नवीन उद्योग किंवा काम सुरु करायचे असेल, त्यांना या योजनेद्वारे कर्ज दिले जाते. त्याचबरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहा दुकानदार यांनाही लोन दिले जाते. मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या कर्ज योजनेच्या नियमनाचे कामही मुद्रा बँकच पहाते.
मुद्रा योजनेतील कर्जाचे प्रकार
शिशू : शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज मिळू शकतं
किशोर : किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाते
तरुण : तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल
मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी
कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही
स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजेत
अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
ओळखीचा पुरावा मतदान ओळख पत्र, आधार कार्ड इ.
रहिवासी पुरावा लाईट बिल, घर पावती.
आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पुर्ण नाव व पत्ता.
अर्जदाराचे 2 फोटो.