Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: कर्ज घेण्याचा विचार करताय, जाणून घ्या टॉप बँकांचे पर्सनल लोनचे व्याजदर

Personal Loan

Personal Loan:सध्या मार्केटमध्ये पर्सनल लोनचा व्याजदर हा 10% ते 16% या दरम्यान आहे. मागील काही वर्षात पर्सनल लोनबाबत बँकांनी आणखी सुलभता आणली आहे. आता बँकांकडून जास्तीत जास्त 7 वर्ष मुदतीसाठी देखील पर्सनल लोन दिले जाते.किमान व्याजदरात कोणत्या बँका पर्सनल लोन देत आहेत याची माहिती घेऊया.

नेहमीच्या खर्चाऐवजी अचानक खर्चाचे कारण निर्माण झाल्यास बहुतेकांना तात्पुरत्या स्वरुपाचे कर्ज घ्यावे लागते. नोकरदार किंवा पगारदार व्यक्तींना झटपट पैसे मिळण्याचा पर्याय म्हणजे पर्सनल लोन. बँका आणि बिगर बँकिंग वित्त संस्थांकडून (एनबीएफसी) पगारदारांना वैयक्तिक कर्ज दिले जाते. पगारतारण कर्ज हा एक झटपट पैसे मिळवण्याचा कर्जाचा प्रकार आहे. सध्या मार्केटमध्ये पर्सनल लोनचा दर हा 10% ते 16% या दरम्यान आहे. मागील काही वर्षात पर्सनल लोनबाबत बँकांनी आणखी सुलभता आणली आहे. आता बँकांकडून जास्तीत जास्त 7 वर्ष मुदतीसाठी देखील पर्सनल लोन दिले जाते.किमान व्याजदरात कोणत्या बँका पर्सनल लोन देत आहेत याची माहिती घेऊया.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.25% पासून सुरु होतो. बँक ऑफ इंडियाकडून जास्तीत जास्त 20 लाख रुपयांचे पर्सनल लोन दिले जाते. या कर्जाची मुदत 84 महिने अर्थात 7 वर्ष इतकी आहे. इंड्सइंड बँकेची ग्राहकांसाठी 30000 ते 50 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्जाची योजना आहे. यात बँकेचा पर्सनल लोनचा व्याजदर हा 10.25% ते 27% या दरम्यान आहे. हे कर्ज जास्तीत जास्त 6 वर्ष मुदतीसाठी दिले जाते.

पंजाब नॅशनल बँकेकडून देखील 10 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. हे कर्ज 60 महिन्यांसाठी दिले जाते. पीएनबीचा पर्सनल लोनचा व्याजदर 10.40% ते 16.95%  इतका आहे.खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेचा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.49% पासून सुरु होते. बँक 5 वर्ष मुदतीसाठी वैयक्तिक कर्ज देते.ग्राहकांना 50000 पासून 40 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेता येईल, असे बँकेने म्हटले आहे.

banks-and-their-interest-rates.jpg

बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून 10% व्याजदराने 20 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते. या कर्जाचा कालावधी 84 महिन्यांचा आहे. आयसीआयसीआय बँकेकडून 6 वर्ष मुदतीसाठी वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाते. बँकेकडून 50 लाखांचे पर्सनल लोन मिळते. पर्सनल लोनचा व्याजदर 10.75% ते 19% या दरम्यान आहे.  

आयडीएफसी बँकेकडून 6 महिन्यांपासून 5 वर्ष मुदतीसाठी वैयक्तिक कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत आहे. बँकेकडून वैयक्तिक कर्जावर 10.49% व्याज आकारले जाते. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँककडून वैयक्तिक कर्जावर 10.50% ते 24% या दरम्यान इंटरेस्ट आकारला जातो. एचडीएफसी बँक ग्राहकांना 40 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. या कर्जाचा कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे.

आयडीबीआय बँकेकडून 5 वर्ष मुदतीचे पर्सनल लोन दिले जाते. आयडीबीआय बँकेचा पर्सनल लोनचा व्याजदर 10.5% ते 15.5% इतका आहे. बँकेकडून जास्तीत जास्त 50 लाख रुपये वैयक्तिक कर्जापोटी दिले जातात. करुर वैश्य बँकेचा पर्सनल लोनचा व्याजदर 10.5% ते 13.5% इतका आहे. करुर वैश्य बँक 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देते.

पैशांची गरज कधी केव्हा निर्माण होईल हे कोणी ठोस सांगू शकत नाही. आर्थिक संकटात असताना तातडीने पैसे मिळणे आवश्यक असते. अशावेळी वैयक्तिक कर्जाचा पर्याय चांगला ठरु शकतो. याशिवाय अन्य कारणासाठीही पैशांची गरज भासते. घरात फ्रीज , टिव्ही अशा उपकरणांसाठी पैसा लागतो किंवा घरातील फर्निचर आणि डागडुजी, रंगकाम तसेच पर्यटनासाठी हाती खर्चाला पैसे असावेत म्हणून अनेकजण अल्प कालावधीचे पर्सनल लोन घेतात. 

वैयक्तिक कर्जासाठी काही तारण ठेवावे लागत नाही. मात्र  इतर कर्जापेक्षा वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो. तसेच त्याच्यावर प्रक्रिया शुल्क आणि दंडसुद्धा इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असतो. परतफेड योग्य प्रकारे न झाल्यास इंटरेस्ट रेट वाढतो शिवाय सिबील रेकॉर्ड खराब झाल्यास भविष्यात कर्ज घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

पर्सनल लोन घेण्यापूर्वी हे मुद्दे लक्षात घ्या

  • वैयक्तिक कर्ज घेताना विशिष्ट खर्चच करावा अशी त्यात अट नसते हा एक आणि काही तारण ठेवावे लागत नाही.
  • हे कर्ज लगेच मंजूर होऊ शकते हा याचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे. 
  • पर्सनल लोन हे सुद्धा विशिष्ट कालावधीत हप्त्याहप्त्याने भरता येते. 
  • क्रेडिट कार्डच्या तुलनेत पर्सनल लोनचा व्याजदर तुलनेने कमी असतो. 
  • वैयक्तिक कर्जाचा कालावधी व हप्त्याची रक्कम आपल्याला ठरवत येते.  
  • दीर्घ कालावधीसाठी अर्थात  60 महिन्यांसाठी सुद्धा वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो.
  • वैयक्तिक कर्ज घेताना तुमचे मासिक उत्पन्न महत्वाचा घटक ठरतो.
  • हे कर्ज घेण्यासाठी निवडक कागदपत्रांची गरज भासते.