गेल्या काही वर्षांपासून भारतात श्रीमंताच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते आहे. या दशकाच्या अखेरीस, म्हणजेच 2030 पर्यंत भारतात अतिश्रीमंत व्यक्तींच्या संख्येत पाच पटीने वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच यापैकी बहुतांश श्रीमंत हे ग्रामीण भारतातून असतील असे एका अहवालात म्हटले आहे.
पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी आणि इंडियाज सिटिझन एन्व्हायर्नमेंटने या संस्थेने बुधवारी जारी केलेल्या अहवालात हे भाष्य केले आहे. ग्रामीण भारतात सध्या आर्थिक परिस्थिती उत्तम असून पैसा कमावण्याचे माध्यमे देखील तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवले गेले आहे. यासोबतच आजवर गेल्या एक दशकांपासून ज्या श्रीमंत व्यक्ती नावारूपाला आल्या आहेत त्या देखील ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या आहेत असे या अहवालात म्हटले आहे. येणाऱ्या काळात देखील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात श्रीमंताची संख्या वाढेल असा अंदाज या अभ्यासात नोंदवला आहे.
सदर अहवालात प्रतिवर्षी 20 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या अतिश्रीमंत कुटुंबांची संख्या 2021 पर्यंत पाच वर्षांत जवळपास दुप्पट होऊन ती 1.8 दशलक्ष होईल असे म्हटले आहे. खेड्यांमध्ये अशा कुटुंबांची वाढ 14.2 टक्के इतकी नोंदवली गेली होती, तर शहरांमध्ये ती 10.6 टक्के इतकी नोंदवली गेली होती. म्हणजेच जवळपास 4% अधिक श्रीमंत लोक हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आहेत.
Rural India Adding Super Rich Faster Than Urban, Study Shows
— menaka doshi (@menakadoshi) July 5, 2023
Read more here...https://t.co/8WsD7DuJsx pic.twitter.com/MqY6PMCzxy
देशभरात केले सर्वेक्षण
पीपल्स रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमी आणि इंडियाज सिटिझन एन्व्हायर्नमेंट या खासगी संशोधन संस्थेने भारतातील जवळपास 25 राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. यात 40,000 हून अधिक लोकांचा सहभाग राहीला आहे. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकांची आर्थिक परिस्थिती अधिक चांगली आहे. तसेच दिवसेंदिवस त्यांच्या संपत्तीत वाढ होते आहे. 2030 अखेरीस ग्रामीण भागातून येणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची ( सरासरी 20 दशलक्ष उत्पन्न) संख्या 9.1 दशलक्ष इतकी होईल.
शेतीसोबत जोडधंदे
या अहवालात हे देखील नमूद केले आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून राहणे सोडले आहे. शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, लांबलेला उन्हाळा, बी-बियाणांची टंचाई या सगळ्यांचा परिणाम शेतीवर होत असतो. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आता केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पुरक ठरतील असे व्यवसाय देखील सुरु केले आहेत.
पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेतीमालावर आधारित इतर व्यवसाय देखील ग्रामीण भागात सुरु झाले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शुक्ला यांनी माध्यमांची बोलताना म्हटले की, "ग्रामीण भागातील लोक व्यावसायिक कृषी व्यवसायात तसेच बिगरशेती कार्यात गुंतले आहेत. ग्रामीण भागात सध्या उद्योजकांचा पूर आला आहे. ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे.”