Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये घसरण मात्र 'वन97 कम्युनिकेशन'चा शेअर तेजीत, गुंतवणूकदार सुखावले

Paytm Share Price

PayTm Share Rally: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 215 अंकांची आणि निफ्टीमध्ये 85 अंकांची घसरण झाली. मात्र या पडझडीत पेटीएम कंपनीचा वन 97 कम्युनिकेशन्स हा शेअर 4% वधारला. या शेअरमध्ये तेजीने गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला.

पेटीएमची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर गेल्या आठवड्यात वन 97 कम्युनिकेशनच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी दिसून आली होती. आज 13 फेब्रुवारी 2023 रोजी वन 97 कम्युनिकेशन्समधील तेजी कायम असल्याचे दिसून आले. एकीकडे शेअर मार्केटमध्ये चौफेर विक्री सुरु असताना वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्ससाठी मागणी होती. आज इंट्रा डेमध्ये वन 97 कम्युनिकेशन्सचा शेअर 4% वधारला होता. (Paytm Shares Rally Today Recover Fridays Loss)

तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर वन 97 कम्युनिकेशनचा शेअर गेल्या आठवड्यात 34% वधारला होता. त्याने 736 रुपयांचा स्तर गाठला होता. मात्र याच दरम्यान सॉफ्टबँक या मुख्य गुंतवणूकदार कंपनी अलिबाबाने 3.4% हिस्सा विक्री करुन गुंतवणूक काढून घेतली होती. यामुळे शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी वन 97 कम्युनिकेशन्सचा शेअर तब्बल 8% कोसळला होता. याची मोठी किंमत कंपनीला मोजावी लागली. वन 97 कम्युनिकेशन्सचे बाजार भांडवल 3520 कोटींनी कमी झाले होते.

Source:https://money.rediff.com

आज सोमवारी मात्र वन 97 कम्युनिकेशनने पुन्हा तेजीची वाट धरली. आजच्या सत्रात तो 4.28% इतका वाढला आणि 678 रुपयांवर गेला होता.  बाजार बंद होताना तो 653.65 रुपयांवर स्थिरावला. त्यात 0.53% वाढ झाली. शेअर मार्केटमध्ये मात्र आज सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी घसरण झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्समध्ये 215 अंकांची आणि निफ्टीमध्ये 85 अंकांची घसरण झाली.

पेटीएमने नोव्हेंबर 2021 मध्ये 18300 कोटींचा आयपीओ बाजारात आणला होता. या आयपीओसाठी प्रती शेअर 2150 रुपये किंमत ठरवण्यात आली होती. नोंदणीच्या दिवशीच हा शेअर 9% च्या घसरणीसह शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता.  तेव्हापासून वन 97 कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरने 439.60 रुपयांचा सार्वकालीन नीचांकी स्तर गाठला होता. बीएसईनुसार वन 97 कम्युनिकेशन्सचे बाजार भांडवल 42755.42 कोटी इतके आहे. 

पेटीएमची आर्थिक कामगिरी सुधारली

  • पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत 31 कोटी रुपयांचा परचालन नफा मिळवला. सप्टेंबर 2023 च्या निर्धारित टाइमलाइनपूर्वीच लक्षणीयरित्या संपादित केला. ईएसओपी मार्जिनपूर्वी ईबीआयटीडीए एक वर्षापूर्वीच्या 27% तुलनेत महसूलाच्या 2% राहिला.
  • पेटीएमने व्यवसायातून चांगला महसूल कमावला. कार्य संचालनामधून कंपनीने 2062 कोटींचा महसूल मिळवला. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 42% वाढ झाली. तिमाही स्तरावर 8% वाढ झाली होती. तिमाहीमध्ये योगदान नफा 1048 कोटी रुपये होता.  डिसेंबर 2022 मध्ये मार्जिन्स 51% वाढले. पेमेंट व्यवसायामधील सुधारित नफ्यामुळे निव्वळ पेमेंट मार्जिन 459 कोटींपर्यंत वाढले.
  • मुख्यत्वे कर्ज वितरण असलेल्या आर्थिक सेवांमधील महसूल आता एकूण महसूलांच्या २२% आहे. जे आर्थिक वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 9% होते. कंपनीच्या कर्ज वितरण व्यवसायाने तिमाहीमधील वितरित करण्यात आलेल्या 9958 कोटी रुपयांच्या 10.5 दशलक्ष कर्जांसह अधिक वाढ केली (त्यांच्या कर्जदाता भागीदारांसोबत सहयोगाने). पेटीएमचा ऑपरेटिंग नफा अप्रत्यक्ष खर्चांमधील कपातीमधून (महसूलाच्या टक्के) दिसून आला आहे. जो डिसेंबर 2021 मधील 58% डिसेंबर 2022 मध्ये 49% पर्यंत कमी झाला.