Amazon Shopping will be Expensive: अॅमेझॉन आपल्या सेल्स पॉलिसीमध्ये 31 मे नंतर बदल करणार आहे; त्यामुळे त्यामुळे 31 मे नंतर कदाचित अॅमेझॉनवरील प्रोडक्टच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत आपण अॅमेझॉनचा वापर बिग सेल ऑफर्ससाठी करत होतो. म्हणजे कोणतीही महागडी वस्तू बाजारातून विकत घेण्यापूर्वी त्याची अॅमेझॉनवरील ऑफर चेक करत होतो. पण आता अॅमेझॉनवर देखील ग्राहकांना काही अधिकची किंमत मोजावी लागणार असल्याचे दिसून येते.
अॅमेझॉन ई-कॉमर्स वेबसाईट ही नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काऊंटसाठी चर्चेत असते. पण सध्या अॅमेझॉन आपल्या सेल्स पॉलिसीमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या नवीन पॉलिसीनुसार 31 मे नंतर अॅमेझॉनवरील उत्पादनांच्या किमती वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जे ग्राहक अॅमेझॉनच्या वेगवेगळ्या ऑफर्सची वाट पाहत आहेत. त्यांनी 31 मे पर्यंत आपल्या वस्तू ऑर्डर केल्यातर त्यावर त्यांना डिस्काउंट मिळेल. अन्यथा, 31 मे नंतर ग्राहकांना विकत घेतलेल्या वस्तूवर कंपनीची सेल्स फी, कमिशनच चार्जेस असे अधिकचे पैसे द्यावे लागतील.
सध्या मार्केटमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक ई-कॉमर्स कंपन्या कंपन्यांकडून थेट माल उचलून त्यातील कमिशनच्या आधारे बिझनेस करतात. हे कमिशन किती घ्यायचे आणि ग्राहकांना तो माल नेमका कितीला विकायचा. याचा निर्णय संबंधित ई-कॉमर्स कंपन्याच घेतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा एका प्रोडक्टची किंमत ई-कॉमर्स साईटवर वेगवेगळ्या दिसतात.
अॅमेझॉनच्या पॉलिसीमध्ये बदल होणार
अॅमेझॉनने आपल्या सेल्स पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 मे नंतर कंपनीच्या प्रॉडक्टच्या किमतीत वाढ होणार आहे. कंपनीने रेडिमेड कपडे, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, औषधे, किराणा मालाचे सामान आदी प्रकारातील वस्तुंच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
कोणत्या कॅटेगरीमध्ये किती वाढ होणार
अॅमेझॉनने रेडिमेड कपड्यांमधील जवळपास 1000 हून प्रोडक्टच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रोडक्टवरील सेल्स फी ही 19 टक्क्यांवरून 22.5 टक्के केली आहे. तर सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तुंवरील कमिशनमध्ये 8.5 टक्क्यांनी वाढ केली.
अॅमेझॉनने याशिवाय मेडिसीनवरील शुल्कामध्येह भरमसाठ वाढ केली आहे. औषधांवरील फ 5.5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर नेली आहे. ही वाढ 500 रुपयांपर्यंतच्या उत्पादनांवर लागू केली आहे. त्याचबरोबर कंपनीने देशांतर्गत उत्पादनांवरील डिलेव्हरी फीमध्येही 20 ते 30 टक्क्यांनी वाढ केली.
अॅमेझॉनच्या या निर्णयामुळे 31 मे नंतर काही प्रोडक्टस ऑनलाईन मागवणे महाग ठरू शकतं. त्यामुळे ग्राहकांनी 31 मे पूर्वीच काही वस्तू ऑर्डर केल्या तर त्यावर त्यांना बऱ्याबैकी सवलत मिळू शकते.