Oraimo Launches Earbuds in India: ओराइमो या इअरबड्स आणि इतर ऑडिओ उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतीय बाजारपेठेत नवीन वायरलेस इयरबड्स FreePods 4 लाँच केले आहेत. हे इयरबड्स बैकग्राउंड मध्ये होणारा आवाज 30 dB पर्यंत कमी करू शकतात. यामध्ये ANC (Active noise cancellation) फीचरला AI अल्गोरिदमचाही सपोर्ट मिळतो. त्याच वेळी, या इअरबड्समध्ये तुम्हाला प्रगत मायक्रोफोन तंत्रज्ञान मिळते, ज्यामुळे तुम्ही स्पष्टपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय फोन कॉल करू शकता.
विविध फंक्शन उपलब्ध
तुम्हाला Freepods 4 मध्ये ट्रांसपैरेंसी मोड देखील मिळेल,याच्या मदतीने तुम्ही इअरबड्स न काढताही आजूबाजूचे आवाज ऐकू शकाल. त्याच वेळी, गेमिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी, तुम्हाला या इअरबड्समध्ये लो-लेटेंसी गेमिंग मोड देखील देण्यात आला आहे.
35 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम
तुम्ही हे इअरबड्स अगदी कमी वेळेत चार्ज करू शकता आणि 35 तासांपर्यंत संगीताचा आनंद घेऊ शकता. फक्त 10 मिनिटे चार्जिंग करूनही तुम्हाला 170 मिनिटांची बॅटरी लाइफ मिळते. Oraimo Sound App द्वारे तुम्ही गाणी ऐकण्याचा तुमचा अनुभव द्विगुणीत करु शकता. या अॅपमध्ये, तुम्हाला Find My Device अॅपची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे तुम्ही इकडे-तिकडे ठेवलेले इअरबड देखील शोधू शकता.
इयरबड्स किंमत किती?
Oraimo FreePods 4 काळ्या रंगात उपलब्ध आहे. हे दोन वर्षांच्या वॉरंटीसह येते. Oraimo FreePods 4 ची किंमत 1999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच, हे इयरबड्स 1,599 रुपयांच्या इंट्रोडक्टरी प्राइससह लाँच करण्यात आले आहेत. हे इयरबड्स ग्राहकांना फ्लिपकार्ट आणि ओराइमोच्या वेबसाइटवरून खरेदी करता येतील.