Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Oppo Reno Series Launched in India: भारतीय बाजारपेठेत ओपो कंपनीची 'Reno 10 5G' सीरिज लॉन्च; फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Oppo Reno Series Launched in India

Image Source : www.gadgets360.com

Oppo Reno Series Launched in India: नामांकित ओपो कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत 'Reno 10 5G' सीरिज लॉन्च केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने 3 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या तिन्ही फोनमध्ये कंपनीने कोणते फीचर्स दिले आहेत आणि त्यासाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, जाणून घेऊयात.

भारतात अनेक स्मार्टफोन कंपन्या सक्रिय आहेत. ज्या अनेक वेगवेगळ्या ब्रँड्सच्या स्मार्टफोनची विक्री करत आहेत.ओपो (Oppo) कंपनीने भारतात काल 12 जुलै रोजी त्यांचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. कंपनीच्या Reno सीरिज अंतर्गत तीन नवीन व्हेरियंट कंपनीने लॉन्च केले. ज्यामध्ये Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro Plus 5G स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. ओपो कंपनीने या तिन्ही फोनमध्ये कोणकोणते फीचर्स दिले आहेत? त्यासाठी ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतील, याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

‘Reno 10 5G’ स्मार्टफोनचे फीचर्स जाणून घ्या

Reno 10 5G फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि Dragoantrail Star 2 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यामध्ये MediaTek Dimensity 7050 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64MP चा मेन कॅमेरा, 32MP चा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ग्राहकांना 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याला चार्ज करण्यासाठी 67W चा चार्जर देण्यात आला आहे.

'Reno 10 Pro 5G' फोनचे फीचर्स जाणून घ्या

Reno 10 Pro 5G फोनमध्ये 6.7 इंचाचा OLED 3D कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 778G 5G चिपसेटवर आधारित आहे.

यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज यामध्ये देण्यात आले आहे.

या फोनची बॅटरी 4,600mAh क्षमतेची असून याला चार्ज करण्यासाठी 80W चा चार्जर देण्यात आला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्लॉसी पर्पल आणि सिल्वर ग्रे हे रंग उपलब्ध आहेत.

‘Reno 10 Pro Plus 5G’ फोनचे फीचर्स जाणून घ्या

Reno 10 Pro Plus 5G फोनचा  120Hz रिफ्रेश रेट असून 6.74 इंचाचा OLED 10 बिट कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनचे रिजोल्यूशन 2772 x 1240px आहे.

या व्हेरियंटमध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64MP टेलिफोटो लेन्स, 50MP अल्ट्रा क्लिअर मेन कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे.

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+Gen1 चिपसेटवर आधारित आहे. यामध्ये कंपनीने 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले आहे.

4700mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये दिली असून तिला चार्ज करण्यासाठी 100W चा चार्जर देण्यात आला आहे. हा चार्जर 27 मिनिटांत फोनला पूर्णतः चार्ज करतो.

किंमत आणि ऑफर्सबद्दल जाणून घ्या

ओपो कंपनीची रेनो 10 ही सीरिज आजपासून म्हणजेच 13 जुलै 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, Amazon आणि ओपो स्टोअरवरून खरेदी करता येऊ शकतात. Reno 10 Pro स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये असून Reno 10 Pro Plus 5G फोनची किंमत 54,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

या फोनची प्री ऑर्डर सुरू झाली असून त्याची खरेदी फ्लिपकार्डवरून करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे एचडीएफसी बँक (HDFC Bank), एसबीआय (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि अक्सिस बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून या फोनची खरेदी केल्यावर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच ग्राहक नो कॉस्ट ईएमआय आधारावर हा फोन खरेदी करू शकतात.

Source: hindi.financialexpress.com