जर तुम्ही प्रत्येक वर्षात कमीत कमी 2 – 3 ट्रिप प्लॅन करता किंवा कामाच्या निमित्ताने प्रवास करत असाल तर यासाठी आवश्यक एक गोष्ट जी करणे करणे तुम्ही विसरुन जाता ती म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance). जर तुम्हाला फिरायला आवडते. तुम्हाला प्रवास करायला आवडते. तर तुम्ही टॅव्हल इन्शुरन्स जरुर घेतला पाहिजे. ट्रॅव्हल इन्शुरन्स कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्या उपयोगी येऊ शकतो. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो. अशा इन्शुरन्समध्ये तुम्हाला सामान चोरी किंवा फ्लाइट मिस होणे यापासून ते मेडिकल एमर्जन्सी पर्यंत सगळ्या प्रकरणात आरामात मदत मिळू शकते. पण ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना प्रश्न निर्माण होतो की इन्शुरन्स ऑनलाईन घ्यावा की ऑफलाईन? आज आपण ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचे फायदे पाहणार आहोत.
ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणं योग्य आहे का?
हा प्रश्न जवळपास सर्वांच्या मनात येतो तो म्हणजे, ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करणे योग्य पर्याय आहे का? हे तर पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स ऑनलाईन घेता की ऑफलाईन. पण याचे काही फायदे आहेत जे ऑनलाईन इन्शुरन्स खरेदी करणे हा पर्याय योग्य ठरवतो.
ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याचे फायदे
- ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना वेळेची बचत होते. तुम्ही जर ऑफलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेत असाल तर वेळही जास्त जातो आणि त्रासही वाढतो.
- ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतेवेळी दुसऱ्या ट्रॅव्हल इन्शुरन्स सोबत तुलना करणे सोपे होते. इतर कंपनींच्या ट्रॅव्हल इन्शुरन्सशी तुलना तुम्ही सहज करु शकता. येथे तुम्ही निरनिराळ्या पॉलिसीज् चा प्रीमियम पाहू शकता त्याचबरोबर त्यांची तुलना देखील करु शकता.
- क्लेम करणे सोपे जाते. जर तुम्ही ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडला तर तुम्ही सोप्या पद्धतीने क्लेम करु शकता. त्यामुळे तुम्हाला जास्त धावपळीच्या त्रासाचा सामना करावा लागणार नाही.
- परवडणारा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियम मिळतो. म्हणजेच प्रीमियमच्या रुपयांमध्ये एजन्टचे कमिशन नसते आणि व्यवस्थापन खर्च देखील कमी होतो.
- रिव्ह्यू पाहू शकता. जर तुम्ही ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेत असाल तर तुम्ही त्यासाठी रिव्ह्यू देखील पाहू शकता. म्हणजेच ज्या व्यक्तीने पूर्वी ती पॉलिसी घेतली आहे त्याचा रिव्हयू तुम्हाला पहायला मिळू शकतो.