Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus Summer Sale 2023: स्वस्तात मस्त स्मार्टफोनवर 12 हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार!

OnePlus Summer Sale 2023

Image Source : www.twitter.com @OnePlus_IN

OnePlus Summer Sale 2023: वन प्लस कंपनीने देखील 'वन प्लस समर सेल 2023' सुरु केला आहे. हा सेल 9 मे 2023 पर्यंत चालू राहणार आहे. यातील खरेदीवर ग्राहकांना 12,000 पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. स्मार्टफोन खरेदीवर नेमका किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घेऊयात.

सॅमसंग कंपनी समवेत आता वन प्लस (OnePlus) कंपनीने देखील 'वन प्लस समर सेल 2023' (OnePlus Summer Sale 2023) सुरु केला आहे. हा सेल 9 मे 2023 पर्यंत चालू राहणार असून या अंतर्गत ग्राहकांना OnePlus कंपनीच्या उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. ही खरेदी ग्राहक ऑनलाईन आणि ऑफलाईन (Online & Offline) अशा दोन्ही पद्धतीने करू शकतात.

जुने फोन एक्सचेंज करण्यासोबत नवीन फोन ग्राहकांना चांगल्या ऑफर्ससहित या सेलमधून खरेदी करता येतील. ज्यावर त्यांना डिस्काउंट देखील दिला जाणार आहे. खास करून या सेल मधून OnePlus 10 Pro, OnePlus 10T, OnePlus 10R आणि Nord सीरिजचे फोन स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. याशिवाय ग्राहक स्मार्ट टीव्ही, अॅक्सेसरीज आणि इतर उत्पादनांवरही आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळवू शकतात. स्मार्टफोन खरेदीवर नेमका किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घेऊयात.

स्मार्टफोन खरेदीवर मिळतोय 12,000 पर्यंत डिस्काउंट

कंपनीचा 8GB रॅम असणारा OnePlus 10T स्मार्टफोन ग्राहकांना या सेलमधून खरेदी केल्यावर 5,000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. या फोनची मूळ किंमत 49,999 रुपये आहे. तर हा फोन वन प्लस समर सेलमधून ग्राहकांना 44,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

OnePlus 10R या स्मार्टफोनवर ग्राहकांची 8,000 रुपयांची बचत होणार आहे. या फोनची मूळ किंमत 38,999 रुपये आहे. सेलमधून हा फोन खरेदी केल्यावर ग्राहकांना तो 30,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच 8GB रॅम असणारा OnePlus 9 हा 5G स्मार्टफोन ग्राहक 37,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. ज्यावर त्यांना कंपनकडून डिस्काउंटही देण्यात येईल.

याशिवाय 8GB रॅम असणारा OnePlus 10 Pro या स्मार्टफोनवर 11,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या फोनची मूळ किंमत 66,999 रुपये आहे. तर हा फोन ग्राहकांना 55,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. अशाच स्वरूपातील ऑफर्स फोनच्या इतर व्हेरियंटवरही उपलब्ध आहे.  

बँक ऑफर्सबद्दल जाणून घ्या

वन प्लस समर सेलमध्ये ग्राहकांना कंपनीकडून 12,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. बँक ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) कार्डवरून ग्राहकांनी खरेदी केल्यावर त्यांना 1,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येत आहे.

कुठून खरेदी करता येईल?

वन प्लस समर सेल 2023 (OnePlus Summer Sale 2023) मधून खरेदी करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतींचा (Online & Offline System) अवलंब करू शकतात. ऑनलाईन खरेदीसाठी OnePlus.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तर ऑफलाईन खरेदीसाठी OnePlus Store ला भेट द्यावी लागेल. 

(Source: aajtak.in)