7 फेब्रुवारी रोजी OnePlus कंपनी जागतिक स्तरावर एक इवेंट आयोजित करणार आहे.यावेळी कंपनी अनेक उपकरणे लॉंच करेल. या इवेंटमध्ये वनप्लस आपला टॅब्लेट देखील लाँच करणार आहे. मात्र लॉंच पूर्वीच या टॅब्लेटचे रेंडर डिजाइन उघड झाले आहे.जाणून घेऊया कुठल्या फीचर्ससह सज्ज असेल नवीन वनप्लस पॅड. 11.6 इंच इतका या टॅब्लेटच्या स्क्रीनचा आकार असेल. हा इवेंट वनप्लस केंद्रित असला तरी कंपन्यांना या इवेंटमध्ये आपली उपकरणे लॉंच करण्याची परवानगी वनप्लस ने दिली आहे.
या इवेंटमध्ये वनप्लस पॅड ( OnePlus Pad ) या मालिकेतला पहिला टॅब्लेट लॉंच केला जाणार असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान कंपनी इतर काही उत्पादने सादर करणार आहे. प्रसिद्ध टेक लिकर स्टीव्ह हेमसोफर (@OnLeaks) ने MySmartPrice सह आगामी वनप्लस पॅडचे डिजाइन शेअर केले आहे. प्रथमच, वापरकर्त्यांना वनप्लस टॅब्लेटची झलक पाहायला मिळणार आहे.
11.6 इंच डिस्प्लेसह असे असेल वनप्लस पॅडचे डीजाइन
वृत्तानुसार, वनप्लस पॅड युनिबॉडी मेटल चेसीस पासून तयार केलेले असेल. याशिवाय या टॅब्लेटमधील बेझलच्या एका बाजूला फ्रंट फेसिंग कॅमेरा उपलब्ध असेल. तर दुसऱ्या बाजूला सामान्य बेझल्स असतील. डिव्हाईसच्या मागील बाजूस एक वेगळा कॅमेरा असेल, त्यासोबत वनप्लसची ब ब्रँडिंग व लोगो असतील. वनप्लस पॅडच्या उजव्या बाजूला वॉल्यूम की असतील. तसेच त्यावर पॉवर बटन असेल.
डिस्प्लेबद्दल तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात लॉंच होणाऱ्या या टॅब्लेटमध्ये एलसीडी की एलईडी पॅनल मिळेल हे अद्याप उघड झालेले नाही. हा टॅब्लेट अधिकृतरित्या लॉंच होण्यास 2 आठवडे शिल्लक आहेत. या टॅब्लेटच्या किमतीबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत.