Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Raksha Bandhan Sale: ई-कॉमर्स प्लॅटफाॅर्म ONDC वर मिळतोय 80% डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Sale

Image Source : www.vocso.com

Raksha Bandhan Sale: सणासुदीच्या दिवसांमुळे सध्या सर्वच ई-कॉमर्स प्लॅटफाॅर्मवर जोरात सेल सुरू आहेत. यामध्ये आता सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफाॅर्म ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स म्हणजेच ONDC ने रक्षाबंधनचे औचित्य साधून एंट्री केली आहे. यामुळे ग्राहकांना आता 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे.

पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडने (PEPL) मंगळवारी पेटीएमवरुन (Paytm) ONDC नेटवर्कवर रक्षाबंधन सेलची घोषणा केली. यामुळे युझर्सना Paytm अ‍ॅपद्वारे मोठ्या ब्रॅण्डच्या वस्तू आकर्षक डिस्काउंटवर घेता येणार आहेत. यामध्ये युझर्सना जवळपास 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, कॅटेगरीनुसार खरेदी केल्यास डिस्काउंट आणि कॅशबॅकचाही युझर्सना लाभ घेता येणार आहे. याचबरोबर आकर्षक गिफ्ट आणि राखी काॅम्बोची सुविधाही  ONDC वर उपलब्ध आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाला युझर्सना चांगल्या डिस्काउंटसह गिफ्ट आणि राखी एकाचवेळी पाठवण्याचा आनंद घेता येणार आहे.

80 टक्क्यांपर्यंत मिळतोय डिस्काउंट

ONDC नेटवर्कसह खरेदी करताना युझर्स इलेक्ट्राॅनिक्स, मोबाईल्स, फॅशन अ‍ॅक्सेसरिज आणि यासारख्या वेगवेगळ्या कॅटेगरीमधून खरेदी केल्यास 80 टक्क्यांपर्यंत  डिस्काउंट मिळवू शकणार आहेत. या सेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या ब्रॅण्डमध्ये बोट, बाउल्ट, रेडमी, द मॅन आणि गिव्हासारख्या कंपन्यांच्या समावेश आहे. या प्रोडक्टवर आकर्षक डिस्काउंट आणि कॅशबॅकसह युझर्स विशेषत रक्षाबंधनला गिफ्ट देण्यासाठी या आकर्षक डिल्सचा वापर करु शकणार आहेत. याचबरोबर सिलव्हर राख्यांवर युझर्सना 50% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे आणि फर्न्स अ‍ॅण्ड पेटल्सद्वारे गिफ्टसाठी 45 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा लाभ घेऊ शकणार आहेत.

RAKHI33 कोड वापरा 33 टक्के मिळवा कॅशबॅक

Paytm ने ONDC नेटवर्कवर गिफ्ट देण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या पर्यायाचा वापर करुन युझर्स कमी किमतीत ड्राय फ्रूट, चाॅकलेट्स आणि स्वीट्ससोबत मोफत शिपिंगसह राखीचा काॅम्बो पाठवू शकणार आहेत. याचबरोबर RAKHI33 या कोडचा वापर युझर्सने केल्यास, त्यांना 33 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळवता येणार आहे. त्यामुळे युझर्सना राखीसह एकदम बजेटमध्ये गिफ्ट देखील पाठवण्याची सुविधा Paytm ने उपलब्ध करुन दिल्यामुळे युझर्सना फक्त गिफ्ट आणि राखी सिलेक्ट करणेच बाकी आहे. यामुळे युझर्सचा वेळ वाचायला मदत होणार आहे. या डिस्काउंटचा लाभ घेण्यासाठी ग्राहक  पेटीएम अ‍ॅपवर दिलेल्या ONDC लिंकचा वापर करुन खरेदी करू शकणार आहेत.

आवश्यक वस्तूंसाठी खास आहे ONDC

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC), भारत सरकारद्वारे चालवण्यात येते. तसेच, ONDC बेंगळूरूमध्ये लाॅंच करण्यात आली असून दिल्ली-NCR, मुंबई, कोलकाता, चेन्नई, कांचीपुरम, हैदराबाद, बागलकोट आणि लखनौमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे युझर्सना फूड, किचनचे साहित्य, फॅशन, इलेक्ट्राॅनिक्स, ब्युटी आणि पर्सनल केअरसारखे प्राॅडक्ट वेगवेगळ्या कॅटेगरीमधून खरेदी करता येते. तसेच, या प्रोडक्टवर आकर्षक डिस्काउंटही उपलब्ध असतो. त्यामुळे युझर्सना बजेटमध्ये खरेदी करण्यासाठी अजून एक वेबसाईट उपलब्ध झाली आहे.