Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OLX Layoff: Olx दीड हजार नोकरकपात करणार; भारतातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फटका

OLX Layoff

इ-कॉमर्स आणि जुन्या वस्तू खरेदी-विक्री क्षेत्रातील कंपनी Olx ने दीड हजार कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण वर्कफोर्सच्या 15% आहे. जगभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार असला तरी सर्वाधिक भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील नोकर कपातीची ट्रेंड सुरू असतानाच इतर क्षेत्रातील कंपन्यांनीही नोकरकपात सुरू केली आहे. इ-कॉमर्स आणि जुन्या वस्तू खरेदी-विक्री क्षेत्रातील कंपनी Olx ने दीड हजार कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण वर्कफोर्सच्या 15% आहे. जगभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार असला तरी सर्वाधिक भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.

व्यवसायातील संधी कमी झाल्या( Olx business reduced)

व्यवसायातील वाढ कमी झाल्याने नोकर कपातीची निर्णय कंपनीने घेतला असून पैसे बचतीवर भर दिला आहे. फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, कार्स यासह विविध वस्तुंची खरेदी विक्री ओएलएक्स प्लॅटफार्मवरून केली जाते. Olx कंपनीचे मुख्यालय नेदरलँड असून जगभरातील विविध कार्यालयात दहा हजार कर्मचारी काम करत आहेत. यातील 15 टक्के कर्मचारी आपली नोकरी गमावतील.

इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन विभागाला सर्वाधिक फटका( engineering and operation employee layoff)

भारतातील नक्की किती कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्रं, इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन विभागातील जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार असल्याचे बोलले जात आहे. भारतामध्ये Olx आणि Olx auto अशा दोन कंपन्यांतर्गत काम चालते. तर जगभरात कंपनीच्या 20 पेक्षा जास्त सेवांचे ब्रँड्स आहेत. ओएलएक्स कंपनीच्या प्रवक्त्याने नोकरकपातीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी नोकरकपातीची निर्णय( To cut cost olx decided to layoff employee)

अर्थव्यवस्थेतील बदलांनुसार ओएलएक्स कंपनी आपली खर्चाची पुनर्रचना करत आहे. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांची कपात करावी लागत आहे, ही खेदाची बाब आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी योगदान दिले त्यांची आम्ही माफी मागतो, मात्र, भविष्यातील लक्ष्य गाठण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना अभिमानाने आणि आदराने वागणूक देण्यावर आमचा भर आहे. सध्याच्या घडीला आम्ही त्यावर लक्ष देत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

ओएलएक्स कंपनीने 2006 साली जागतिक स्तरावर काम सुरू केले. तर भारतामध्ये 2009 साली एंट्री केली. Olx कंपनीची मालकी Prosus ग्रुपकडे आहे. या कंपनीने भारतातील बैजू, स्वीगी, फार्मइझी, मेशो, कॅशीफाय आणि इतरही अनेक कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. कंपनीचे मुख्यालय नेदरलँड येथे आहे.