ओला कंपनीचं युनिट ओला इलेक्ट्रिक लवकरच वेळ निश्चित करून आपला आयपीओ आणणार आहे. तज्ज्ञांच्या मते, याची जबाबदारी गोल्डमन सॅच्सपासून (Goldman Sachs) कोटक सिक्युरिटीजसारख्या (Kotak securities) विविध एजन्सींवरही सोपवण्यात आलीय. मिळालेल्या आकडेवारीनुसार, हा आयपीओ 6600 कोटी ते 8000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटी किंवा चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीला हा आयपीओ लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. सध्या या आयपीओची चर्चादेखील बाजारपेठेत होताना दिसतेय.
Table of contents [Show]
विविध कंपन्यांकडे जबाबदारी
मीडिया रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिक 800 दशलक्ष डॉलर ते 1 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 6600 कोटी रुपयांवरून 8000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या उद्देशानं 10 अब्ज डॉलर मूल्यासह आयपीए आणण्याची योजना आखत आहे. याच रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय, की ओला इलेक्ट्रिकनं गोल्डमन सॅच्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, सिटी आणि कोटक सिक्युरिटीजला आपल्या आयपीओसाठी लीड मॅनेजर म्हणून नियुक्तदेखील केलंय. कंपनीनं सिरिल अमरचंद मंगलदास आणि शार्दुल अमरचंद मंगलदास यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती केलीय.
India's Ola Electric aims for IPO by 2023-end, hires Goldman, Kotak - source https://t.co/hrW2rP01p9 pic.twitter.com/mY8Xz3wbsF
— Reuters Asia (@ReutersAsia) May 25, 2023
बनणार पहिली भारतीय ईव्ही निर्माता कंपनी
सध्याच्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ हा चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत किंवा चौथ्या तिमाहीत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हे नवीन अंक आणि ओएफएसचं संयोजन असू शकतं. ओएफएस हा आयपीओच्या 10 टक्के आहे. ओला इलेक्ट्रिक ही लिस्ट होणारी पहिली भारतीय ईव्ही निर्माता कंपनी असणार आहे. जर कंपनी 10 बिलियन अमेरिकन डॉलरचं मूल्यमापन करू शकली, तर कंपनी बजाज ऑटो आणि आयशर मोटर्सच्या नंतर भारतातला तिसरा सर्वात मौल्यवान टू-व्हीलर ब्रँड बनणार आहे.
ओलाची कामगिरी
इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक 2017पासून कार्यरत आहे. एप्रिलमध्ये कंपनीनं सुमारे 30,000 स्कूटर विकल्या. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आहे. सध्या इलेक्ट्रिक स्कूटर स्पेस मार्केट लीडर म्हणून ओलाकडे पाहिलं जातं. सध्या आयपीओचं मूल्य ठरवण्यात आलं नसलं तरी 5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे भारताचा या वर्षातला हा सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत हे कठीण असलं तरी कागदपत्रे दाखल करणं, गुंतवणूकदारांना मार्केटिंग या सर्व बाबींवर कंपनी काम करत असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येतंय.
ओलाविषयी...
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही एक दुचाकी निर्माता कंपनी आहे. भाविश अगरवाल यांनी 2017मध्ये या कंपनीची स्थापना केली. दुचाकींमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी प्रामुख्यानं निर्माण केल्या जातात. बेंगळुरू याठिकाणी कंपनीचं मुख्यालय आहे. तर तामिळनाडूच्या कृष्णगिरी याठिकाणी कंपनीचा उत्पादन कारखाना आहे. कंपनीत सध्या S1 Air, S1, S1 Pro अशा प्रकारांत स्कूटर निर्मिती होते. मोटर व्हेइकल मॅन्यूफॅक्चरिंग, मोटर व्हेइकल डिस्ट्रीब्यूशन, चार्जिंग सोल्यूशन आणि ईव्ही बॅटरीज अशा सेवा कंपनीतर्फे पुरवल्या जातात.