Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्षयरोग रूग्णांना दरमहा 500 रूपयांचा पोषण भत्ता

क्षयरोग रूग्णांना दरमहा 500 रूपयांचा पोषण भत्ता

निक्षय पोषण योजना: क्षयरोग रूग्णांच्या पौष्टिक आहारासाठी केंद्र सरकारची अर्थसाहाय्य योजना

क्षयरोग (टीबी) हा एक गंभीर आजार आहे. हा आजार असलेल्या रूग्णाला पोषण आहार आणि योग्य वेळी औषधोपचार मिळाला नाही तर त्याचे जीवनमान खालाऊ शकते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, क्षयरोग असलेल्या रूग्णांना औषधांबरोबर ताज्या आणि सकस अन्नाची गरज असते. पण बऱ्याच लोकांकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसतात. काहींना पुरेसे अन्नही मिळू शकत नाही. अशा रूग्णांना वेळेवर पौष्टिक आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारने निक्षय पोषण योजना Nikshay Poshan Yojana सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार क्षयरोग (NTEP-National Tuberculosis Elimination Programme) पीडितांना आर्थिक सहाय्य करते. ह्या योजनेअंतर्गत क्षयपीडित रुग्णांना उपचार आणि पौष्टिक आहारासाठी 500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 1 एप्रिल, 2018 पासून ही योजना राबविली जात आहे.

या योजनेत निक्षय वेबपोर्टलवर (https://nikshay.in) नोंद होणाऱ्या प्रत्येक क्षय रोग्याला उपचार सुरू असेपर्यंत प्रत्येक महिन्याला 500 पोषण आहार भत्ता दिला जातो. सरकारी किंवा खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्व क्षय रूग्णांना या योजनेचा लाभ घेता येतो. यासोबतच सरकारने अधिकृतरीत्या अधिसूचित केलेल्या आदिवासी भागातून आलेल्या रूग्णाला प्रवासाचा खर्च म्हणून एकदा 750 रूपये प्रवासभत्ता दिला जातो. हे सर्व पैसे रूग्णाच्या बॅंक खात्यात जमा होतात. जर रूग्णाचे स्वत:च्या नावाने बॅंक खाते नसेल तर कुटुंबातील इतर व्यक्तीच्या बॅंक खात्यात हे पैसे जमा होण्याची तरतूद आहे. यासाठी संबंधित रूग्णाची संमती असणे आवश्यक आहे. तसेच 18 वर्षांखालील रूग्णाचा भत्ता त्याच्या पालकांच्या बॅंक खात्यात जमा केला जातो.

निक्षय पोर्टलवर नोंदणी कशी करायची?
निक्षय पोर्टलवर रूग्णांना स्वत:हून नोंदणी करायची नाही. रूग्ण ज्या रूग्णालयात उपचार घेत आहे, तेच या रूग्णाची निक्षय पोर्टलवर नोंदणी करतील.

निक्षय पोषण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. डॉक्टरांनी प्रमाणित केलेल्या आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र
2. बँकेचे पासबूक
याव्यतिरिक्त संबंधित योजनेबाबतच्या अधिक माहितीकरीता 1800116666 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.